बीड

प्रशासनाने लॉकडाऊन केल्यास जिल्हाधिकाऱ्यांच्या दारात सामूहिक आत्महत्या करणार- प्रा. शिवराज बांगर

बीड, दि.२३ (लोकाशा न्यूज) : आज बीडमध्ये पुन्हा लोकडाऊन च्या हालचाली सुरू असून मागच्या वर्षभरानंतर आत्ता व्यावसाय जनजीवन सुरळीत होत असताना जाणीवपुर्वक रुग्णांची संख्या वाढून बंदच्या हालचाली सुरू आहेत. बंद मध्ये सरकारी बाबूंच्या पगारी सुरू असतात दोन नंबर कडून हप्ते वसुली जोरात असते पण मायबाप आमचे अन आमच्या लेकरांचे पोट आमच्या व्यवसायावर आहे… तुमच्या या आडमुठ्या धोरणामुळे व्यावसायिक प्रचंड त्रासात असून त्याने थकलेले जागेचे भाडे, विजेचे बिल आई व बायको यांचे दागिने गहाण ठेऊन भरले आहे. असे असताना पुन्हा बंद केल्यास त्यांना आत्महत्या केल्या शिवाय पर्याय नाही.
मग ही आत्महत्या आम्ही आमच्या घरी नाही तर सामूहिकरीत्या जिल्हाधिकाऱ्यांच्या दारात करणार आहोत असे शिवराज बांगर यांनी म्हटले आहे . जिल्हाधिकारी कुणी सांगतो म्हणून गरिबांचे जीवन हलाल करणार असतील तर लोकशाही आहे आम्ही ते खपवून घेणार नाही , जगताप साहेबानी नगर चे आकडे पहावेत 800 पार असताना देखील नगर चे जिल्हाधिकारी लॉकडाऊन बद्दल विचार नसल्याचे सांगतात मात्र बीड मध्ये एवढी घाई का असा सवाल बहुजन वंचित कडून समोर आणला गेलाय असे होणार असेल अन कुठला एक व्यक्ती लॉक डाऊन करा म्हणतो जर असे अघोरी निर्णय होणार असतील तर आम्ही उपाशी मरण्या पेक्षा खुशीने आत्महत्या करू असा इशारा दिला आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!