बीड पाटोदा

पाटोदा तालुक्यातील पारगाव (घुमरा) येथे एकाचा वीज पडून मृत्यू

पाटोदा तालुक्यातील पारगाव (घुमरा) येथे एकाचा वीज पडून मृत्यू झाल्याची घटना आज (23) सकाळी घडली. या घटनेमुळे संपुर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
पाटोदा तालुक्यातील पारगाव घुमरा येथील शहाजी भुंजगराव भोसले वय 50 असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ते सकाळी शेतातील पिकाची पाहणी करण्यासाठी शेतात गेले होते. खुप वेळ झाला, अजुन घरी कसे आले नाहीत, म्हणून त्यांना पाहण्यासाठी शेतात गेल्यावर हा प्रकार लक्षात आला. गेल्या दोन दिवसापासुन जिल्ह्यात अवकाळी पावसाचा तडाका सुरु असुन यात अनेकांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. यात आज एकाचा बळी गेला असुन या मुळे या शेतकऱ्याचे कुटुंब उघड्यावर पडले आहे

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!