बीड महाराष्ट्र

पूजा चव्हाण सोबत रूममध्ये राहणाऱ्या अरुण आणि “त्या” मंत्र्याची ऑडिओ क्लीप व्हायरल; आत्महत्या प्रकरणातील सत्य का लपवताय? ठाकरे सरकारला फडणवीसांचा सवाल

बीड, दि. 11 पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी आता राजकारण तापताना दिसत आहे. या प्रकरणात ठाकरे सरकारमधील एका मंत्र्याचं नाव जोडलं जात असल्यामुळे भाजप नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. पुणे पोलिसांनी तात्काळ कारवाई केली पाहिजे. या प्रकरणातील तथ्य बाहेर काढलं पाहिजे. जे काही सत्य असेल बाहेर आणायला हवं, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिलीय.
या प्रकरणात ठाकरे सरकारमधील एक मंत्र्याचा संबंध जोडला जात असून, त्याच्या काही कथित ऑडिओ क्लिप सध्या समाजमाध्यमांमध्ये व्हायरल झाल्या आहेत. त्यातपूजा चव्हाण हिच्यासोबत रूममध्ये राहणाऱ्या अरुण नामक एक व्यक्ती प्रकरण दाबण्यासाठी मंत्री काही सूचना करीत असल्याचा संवाद आहे.
कोणत्याही परिस्थितीत लॅपटॉप, मोबाइल ताब्यात घे हे प्रकरण वाढता कामा नये, अशा सूचना त्या संवादात आहेत. या कथित ऑडिओ क्लिपतुन असे लक्षात आल्याने काही व्यक्तींनी मुद्दाम संवाद रेकॉर्ड करून ठेवले, असे म्हटले जाते. पूजा चव्हाणच्या फेसबुक प्रोफाइलवर एका मंत्र्याचा फोटो होता. त्याअनुषंगानेही सर्वत्र चर्चा होत आहे.

अशावेळी भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान दिलंय. भातखळकर यांनी ट्वीट करत मुख्यमंत्री ‘राठोडगिरी’ सहन करणार का? असा प्रश्न विचारलाय. भातखळकरांचं हे ट्वीट म्हणजे त्यांनी शिवसेनेच्या कुठल्या मंत्र्याकडे तर इशारा केला नाही ना, अशी शंका व्यक्त केली जात आहे. तसंच संबंधित मंत्र्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणीही भातखळकर यांनी केलीय.

शिवसेनेची भूमिका काय?

पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात अजून तरी शिवसेनेनं कुठलीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. पण भाजपा ज्या पद्धतीनं हे प्रकरण आता समोर मांडतय ते पहाता शिवसेनेची प्रतिक्रिया अपेक्षित आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!