बीड, दि.१ (लोकाशा न्यूज) :- श्री संघाचे प्रभारी विश्वस्त तथा ज्येष्ठ सुश्रावक श्री भगवानदासजी लोढा यांच्या धर्मपत्नी आणि प्रतिष्ठित व्यावसायिक श्री सचिन लोढा व श्री नितीन लोढा यांच्या मातोश्री सौ. आशाबाई भगवानदास लोढा (आर्वीवाला) यांचे सोमवार, दि. १ जून २०२६ रोजी संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान दुःखद निधन झाले. निधनसमयी त्यांचे वय ७२ वर्षे होते. अत्यंत शांत, मनमिळावू व साध्या स्वभावाच्या म्हणून परिचित असलेल्या सौ. आशाबाई लोढा यांच्या पश्चात पती, दोन पुत्र, एक कन्या, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्या श्री संघाचे ज्येष्ठ सुश्रावक श्री बन्सीलालजी लोढा यांच्या वहिनी होत.त्यांच्या निधनाने लोढा परिवारासह सामाजिक व धार्मिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत असून, अनेक मान्यवरांकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे. त्यांची अंत्ययात्रा मंगळवार, दि. २ जून २०२६ रोजी सकाळी १० वाजता जिजामाता चौक येथील राहत्या घरापासून निघणार आहे. दरम्यान लोढा कुटुंबाच्या दुखात दैनिक लोकाशा परिवार सहभागी आहे.








