बीड

पंकजाताई मुंडेंच्या प्रचारार्थ परळी मतदारसंघांत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेससह महायुतीचे कार्यकर्ते सरसावले, कॉर्नर बैठका, अन् घरोघरी मतदारांना प्रत्यक्ष भेटून काढत आहेत ग्रामीण भाग पिंजून, लेकीसाठी जीवाचे रानं करु; विक्रमी मताधिक्य देण्याचा मतदारांचा निर्धार

परळी । दि.३०।
भाजपा-महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारार्थ भाजप, राष्ट्रवादी काँग्रेससह महायुतीच्या प्रमुख पदाधिकार्‍यांनी विधानसभा मतदारंसघनिहाय प्रचार यंत्रणा गावोगावी सक्रिय केली असून मतदारसंघ पिंजून काढला आहे. महायुतीचे घटक पक्ष असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, तसेच शिवसेना, रासप, रिपाइं, मनसे या सर्व पक्षांच्या प्रमुख पदाधिकार्‍यांनी मतदार संघातील जिल्हा परिषद सर्कलनिहाय गावा-गावातील घरोघरी जावून मतदारांपर्यंत पोहचले आहेत. ठिकठिकाणी मतदारांचा पंकजाताईंच्या नेतृत्वाला प्रचंड मोठा प्रतिसाद मिळत आहे. ‘लेकीसाठी जीवाचे रान करु; विक्रमी मताधिक्य देवू’ असा निर्धार मतदारांनी व्यक्त केल्याने महायुतीच्या पदाधिकार्‍यांचा प्रचाराचा उत्साह आणखी दुणावला आहे.

पंकजाताई मुंडे यांच्यासाठी महायुतीचे शहर व ग्रामीण भागातील कार्यकर्ते कंबर कसून कामाला लागले आहेत. शहरा पाठोपाठ गेल्या तीन दिवसांपासून ग्रामीण भागात त्यांनी प्रचाराचा जोर वाढवला आहे. महायुतीचे पदाधिकारी ठिकठिकाणी बैठका, गाठीभेटी,पदयात्रा काढत असून याला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. कार्यकर्ते गावा-गावात जावून पंकजाताईंचे बीड जिल्ह्याचे विकासाचे व्हिजन हे पदाधिकारी मतदारांना सांगत त्यांना विकसित बीड जिल्ह्यासाठी पंकजाताई मुंडे यांच्या विजयासाठी मतदान करण्याचे आवाहन करत आहेत. भाजपला मत म्हणजे विकासाला मत आहे हे सूत्र समोर ठेवून तुम्ही सर्व सुज्ञ मतदारांनी पंकजाईंना एक संधी द्यावी असे आवाहन केले जात आहेत. दरम्यान आपली लेक जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार या भावनेतून गावोगावच्या ग्रामस्थांत समाधान व्यक्त होत असून विक्रमी मताधिक्य देवू असा विश्वास मतदार देत आहेत.

तालुक्यातील सिरसाळा, पिंपरी, दादाहरी वडगाव, धर्मापूरी, जिरेवाडी, नागापूर तसेच अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर, बर्दापूर, पट्टीवडगांव, राडी आदी जिल्हा परिषद गटात या पदाधिकार्‍यांनी पंकजाताईंसाठी जोरदार प्रचार सुरु केला आहे. घरोघरी जावून मतदारांशी प्रत्यक्ष संवाद हे पदाधिकारी साधत आहेत. ठिकठिकाणच्या गावांमध्ये पंकजाताईंना मोठे मताधिक्य देण्याचा विश्वास मतदार व्यक्त करत आहेत.

जिल्ह्याचा सर्वांगीण विकास समोर ठेवून मतदारांनी इतर कोणत्याही अपप्रचाराला बळी न पडता भाजपला मतदान करावे. तुमची प्रतिनिधी म्हणून संसदेत काम करताना पंकजाताई मुंडे या प्रत्येक मत विकासासाठी कामी लावतील. आगामी काळात जिल्ह्याच्या ठिकाणी मोठे हॉस्पिटल उभारणी करण्याबरोबरच उद्योग- व्यापार वाढवून दहा हजार तरुणांना जिल्ह्यातच रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी पंकजाताई काम करणार आहेत.याशिवाय विकसित जिल्हा म्हणून जे-जे केंद्र सरकारच्या माध्यमातून करणे शक्य होईल ती कामे पंकजाताईंच्या माध्यमातून पुर्ण होतील. त्यामुळे येत्या 13 मे रोजी कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करावे असे आवाहन महायुतीचे पदाधिकारी करत आहेत.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!