बीड

गुंडगिरी करणाऱ्या शिक्षकांना सीईओंचा दणका, मुख्याध्यापकास मारहाण करणे भोवले, शेकट्याच्या त्या दोन्ही शिक्षकांना तडकाफडकी केले निलंबित


बीड, छोट्या जातीच्या मुख्यापकाच्या हाताखाली काम करण्यास शिक्षकांना लाजू वाटू लागल्याने शेकटा येथील झेडपीच्या मुख्याध्यापकास दोन शिक्षकांनी कट रचून अंगावर गाडी घालत भर रस्त्यावर जबर मारहाण केली, ही घटना 12 मार्च रोजी पाडळशिंगी हायवेवर दुपारी चार वाजता घडली होती. या घटनेत जखमी झालेल्या मुख्याध्यापकास जिल्हा रुग्णालयातील वार्ड क्रमांक पाच मध्ये उपचार घेण्यासाठी दाखल करण्यात आले, याबाबत गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर आता गुंडगिरी करणाऱ्या त्या दोन शिक्षकांना सीईओ संगीता देवी पाटील यांनीही मोठा दणका देऊन मुख्याध्यापकास मारहाण केल्याप्रकरणी त्या दोन्ही शिक्षकांना तडकाफडकी निलंबित केली आहे, या कारवाईमुळे शिक्षण विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

अंबादास मल्हारी नारायणकर असे मारहाण झालेल्या शिक्षकाचे नाव आहे, नारायणकर गेवराईंच्या शेकटा येथील झेडपीच्या शाळेवर मुख्याध्यापक आहेत, त्यांच्यासह या शाळेत आठ शिक्षक कार्यरत आहेत, छोट्या जातीच्या मुख्याध्यापकाच्या हाताखाली काम कसे करावे, म्हणून मुख्याध्यापक अंबादास नारायणकर यांना सातत्याने सह शिक्षक रघुनाथ नागरगोजे आणि सुभाष संतोष गिरी हे दोघे त्रास देत होते, 12 मार्च रोजी तर या दोघांनी कळसच केला, गाडीमधून प्रवास करताना नागरगोजे आणि गिरी या दोघांनी कट रचून पाडळशिंगी परिसरात अंगावर गाडी घालून भर रस्त्यावर बेदम मारहाण केली, यावेळी सहशिक्षक राजेंद्र घोडके आणि लक्ष्मण परझने यांनी गिरीला रोखले त्यामुळे मुख्याध्यापक अंबादास नारायणकर यांचा जीव वाचला, शिक्षकांच्या अश्या वागण्याने बीड झेडपीची इभ्रत वेशीला टांगली गेली होती, याप्रकरणी गेवराई पोलिस ठाण्यात सदर मुख्याध्यापकांने दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आता सदर मुख्याध्यापकास मारहाण करणाऱ्या त्या दोन्ही शिक्षकांना तडकाफडकी निलंबित करून सीईओ संगीता देवी पाटील यांनी मोठा दणकाच दिला आहे, सीईओंच्या या कारवाईमुळे झेडपीच्या शिक्षण विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!