बीड

पेट्रोल डिझेलच्या टँकरने घेतला दोघांचा जीव, बीड-नगर राज्य महामार्गावर भीषण अपघातात दोघे जागीच ठार

अंमळनेर (लोकाशा न्युज) कडा येथील काम आवरून धामणगांव मार्ग पाटोदा तालुक्यातील संकुडवाडीला निघालेल्या दुचाकीस्वाराला धामणगांव येथे हात करून लिप्ट मागत बसून जात असताना दुचाकीला समोरासमोर झालेल्या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बीड-नगर राज्य महामार्गावरील डोईठाण येथील शिवनेरी चौकात रविवारी सायंकाळी चारच्या दरम्यान घडली. अनिल विठ्ठल तरटे वय १९,महादेव गायकवाड असे मृताचे नावे आहेत.

 पाटोदा तालुक्यातील संकुडवाडी येथील महादेव गायकवाड हे कडा येथून काम आवरून धामणगांव मार्ग गावाकडे जात असताना धामणगांव येथे डोईठाण येथील एकाने हात करून लिप्ट मागितल्याने त्याला दुचाकीवर घेऊन गावाकडे रविवारी सायंकाळी चारच्या दरम्यान जात असताना बीड नगर राज्य महामार्गावरील डोईठाण परिसरात शिवनेरी चौकात बीड येथे डीझेल खाली करून अहमदनगरच्या दिशेने जात असलेल्या टँकर क्रमांक एम.एच १६,सी.सी.७६३१ याची जोराची धडक दुचाकी बसल्याने  झालेल्या अपघातात दोघाचा जागीच मृत्यू झाला असून अपघात घडताच टँकर चालक पसार झाला होता.कडा पोलिस चौकीच्या पोलिसांनी त्या टँकर चालकाला टँकर सह ताब्यात घेतले आहे. घटनास्थळी परिसरातील नागरिकांनी धाव घेतली. आष्टी पोलिस देखील तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!