बीड

मराठा समाजाच्या तरूणांवर गुन्हे दाखल करू नयेत, पंकजाताईंसह राजेंद्र मस्केंचे एसपींना पत्र


बीड, दि. 24 (लोकाशा न्यूज) : मराठा समाजाच्या तरूणांवर गुन्हे दाखल करू नयेत, असे पत्र भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी बीड पोलिस अधीक्षकांना दिले आहे. बीडचे डीवायएसपी विश्‍वंभर गोल्डे यांनी हे पत्र स्विकारले आहे.
मला अशी माहिती मिळाली आहे की, माझ्या दौर्‍यात बीड तालुक्यातील साक्षाळपिंपरी येथील दोन तीन युवकांनी काळे रूमाल घेवून निदर्शने केले. या युवकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. आरक्षणाच्या मागणीसाठी शांतपणे निदर्शने करण्याबाबत कोणतीही हरकत असण्याचे कारण नाही, माझी याबाबत कोणतीही तक्रार नाही, ही मुलं तरूण वयाची, बहुतेक शिक्षण घेणारी किंवा नोकरीसाठी प्रयत्न करणारी असावीत, गुन्हे दाखल केल्याने त्यांच्या पुढील प्रवासामध्ये त्यांना अडचणी निर्माण होवू शकतात, ते होवू न देणे ही बीड जिल्ह्याचे नेतृत्व म्हणून माझी जबाबदारी आहे आणि ते परिपव्कपणाचे ठरेल असे मला वाटते, कोणत्याही शासकिय मालमत्तेचे नुकसान होत नसेल किंवा व्यक्तीला हानी/ईजा होत नसेल, आचारसंहितेचा भंग होत नसेल, कायद्याचे उल्लंघन होत नसेल तर असे गुन्हे दाखल करण्यात येवू नयेत, अशी विनंती पंकजाताईंनी पोलिस अधीक्षकांकडे केली आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी बीडचे डीवायएसपी विश्‍वंभर गोल्डे यांच्याकडे हे पत्र दिले आहे. यावेळी देवीदास नागरगोजे, मुन्ना फड यांच्यासह भाजपच्या इतर पदाधिकार्‍यांची उपस्थिती होती.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!