बीड

अखेर सुरेश कुटे, अर्चना कुटे भाजपात, नागपूरमध्ये झाला प्रवेश


बीड दि. १० : बीड जिल्ह्यातील प्रसिद्ध उद्योजक तथा ‘द कुटे ग्रुप ‘ चे सर्वेसर्वा सुरेश कुटे यांचा अखेर भाजपप्रवेश झाला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत नागपूर येथे कुटे यांनी भाजपात प्रवेश केला. यावेळी अर्चना कुटे यांचीही उपस्थिती होती.
बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र असलेले आणि ‘द कुटे ग्रुप ‘च्या माध्यमातून देशभर ओळख असलेले सुरेश कुठे यांच्या कुटे उद्योग समूहावर काही दिवसांपूर्वी आयकर विभागाने तपासणी मोहीम हाती घेतली होती. त्यावेळेपासून सुरेश कुटे राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा होत्या. सुरेश कुटे आणि अर्चना कुटे हे दाम्पत्त्य भाजपात प्रवेश करील अशा अटकळी अनेक दिवसांपासून बांधल्या जात असतानाच आज (दि. १० ) कुटे यांनी जाहीरपणे भाजपात प्रवेश केला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांना प्रवेश दिला. या प्रवेशाने आता बीड जिल्ह्यातील भाजपमधील अनेक समीकरणे बदलणार आहेत. विशेष म्हणजे या प्रवेशावेळी बीड जिल्ह्यातील भाजपचा कोणताही मोठा पदाधिकारी उपस्थित नव्हता.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!