बीड

भजनाच्या कार्यक्रमातच तरडगव्हाणमध्ये हाणामारी; एक गंभीर;13 जनाविरुद्ध गुन्हा दाखल

बीड दि.22 (प्रतिनिधी):
पूर्वीच्या किरकोळ भांडणाचा मनात राग धरून दिनांक 20 एप्रिल रोजी गावात सुरू असलेल्या भजनाच्या कार्यक्रमात येऊन रात्री साडे अकराच्या सुमारास आपणास व मुलगा ओम चंद्रकांत वाघ याला गणेश शंकर वाघ व इतर 13 जणांनी मारहाण करून जीवघेणा हल्ला केल्याची तक्रार शिरूर कासार तालुक्यातील तरडगव्हाण येथील ओम चंद्रकांत वाघ यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक बीड यांच्याकडे केली आहे. सदर प्रकरणी चकलांबा पोलिस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले आहेत
चकलांबा पोलीस ठाण्यात ओम चंद्रकांत वाघ यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, तरडगव्हाण येथील गणेश शंकर आघाव, महेश आघाव, देवेंद्र आघाव, जगन्नाथ नागरगोजे, आसाराम सोनाजी आघाव, मंगेश आसाराम आघाव,निलेश आसाराम आघाव,गोरक्ष जगन्नाथ नागरगोजे, विठ्ठल प्रल्हाद बारगजे, हरिहर मुरलीधर बांगर, विवेक एकनाथ बारगजे, विठ्ठल महादेव आघाव, शंकर महादेव आघाव आदींनी दिनांक 20 एप्रिल रोजी रात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास पालखी मिरवणूक पाहण्यासाठी हनुमान मंदिर समोर गेलो असता गावातील यात्रा असल्यामुळे हनुमान मंदिरासमोर भजन भजनाचा कार्यक्रम चालू होता. त्याठिकाणी माझे आजोबा व वडील चंद्रकांत वाघ हे भजनाच्या कार्यक्रम असताना गावातील जगन्नाथ किसन नागरगोजे आसाराम सोनवणे जळगाव मंगेश आश्रम आघाव, निलेश आसाराम आघाव,गोरक्ष जगन्नाथ नागरगोजे, विठ्ठल प्रल्हाद बारगजे, हरिहर मुरलीधर बांगर, विवेक एकनाथ बारगजे, विठ्ठल महादेव आघाव, शंकर महादेव आघाव यांनी एकत्र येऊन जुन्या भांडणाच्या कारणावरून आजोबा व वडिलांना मारहाण करू लागले. यावेळी गावातील काही जणांनी मध्यस्थी करून सोडवण्याचा प्रयत्न केला. मीही भांडण सोडवण्यासाठी गेलो असता महेश विठ्ठल आघाव व देवेंद्र विठ्ठल आघाव यांनी मला धरले व गणेश आघाव याने माईकचे लोखंडी स्टॅन्ड माझ्या डोक्यात मारून गंभीररित्या जखमी केले आहे. यावेळी आम्ही तुम्हाला जिवंत मारू, अशा प्रकारची धमकी दिली. सदर चकलांबा पोलीस ठाण्यात गु र.नं. 125/ 2024 कलम 324, 323, 504, 506, 143, 147,148, 149 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात पुढील तपास पोहे. मारुती खेडकर हे करत आहेत.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!