बीड

मिल्लीया प्रकरणी तीन शिक्षिका निलंबित तर दोघींची स्वेच्छा निवृत्ती

बीड | :- शहरातील मिल्लीया शाळेतील व्हिडीओ आणि ऑडियो प्रकरणात तीन महिला शिक्षिकांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. तर दोन शिक्षिकांनी स्वेच्छा निवृत्ती घेतल्याची माहिती अंजुमन ईशात ए तालीम या संस्थेच्या वतीने देण्यात आली. संस्था या प्रकरणात कोणालाही पाठीशी घालत नाही. आतापर्यंत जे दोषी आढळले आहेत त्यांच्यावर संस्थेने कडक करवाई केली आहे. त्यामुळे पालकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. आतापर्यंत जसे सहकार्य केले तसेच यापुढेही करावे असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

बीड शहरातील मिल्लीया शाळेतील एका शिक्षकाने केलेल्या घाणेरड्या कृत्याप्रकरणी त्याच्या विरुद्ध यापूर्वीच संस्थेने सेवेतून निलंबनाची कारवाई केली आहे. त्यानंतर या प्रकरणात व्हिडिओ आणि ऑडिओ संदर्भात आतापर्यंत जे जे कोणी दोषी आढळले आहेत. त्यांच्यावरही कडक कारवाई करण्यात येत आहे. या प्रकरणात या शाळेतील तीन शिक्षिकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून दोन शिक्षिकांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली आहे. संस्थेने कायदेशीर बाबी आणि पूर्ण चौकशी अंति यापूर्वीच एका शिक्षिकेवर निलंबनाची कारवाई केली होती. त्यानंतर गुरुवार ता. 30 नोव्हेंबर रोजी आणखी दोन शिक्षिकांना निलंबित करण्यात आले असून याचवेळी अन्य दोन शिक्षिकांनी स्वेच्छा निवृत्ती घेतल्याची माहिती संस्थेने दिली आहे. संस्थेने सुरुवातीपासूनच या प्रकरणात कायदेशीर कार्यवाही सुरू केली होती. त्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात कोणाचीही गय करण्यात आलेली नाही. दोषी आढळले त्यांच्यावर सक्त कारवाई करण्यात आलेली आहे. त्यामुळे पालकांनी, नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता संस्थेला आणि शाळेला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!