बीड

पंकजाताई बीड जिल्ह्याची शान..!जिल्ह्याच्या हितासाठी, विकासासाठी लढणार्‍या ताईंना जपा – आनंद शिंदे, तर ताई म्हणाल्या, संविधानाला नख लावण्याचा कोणी प्रयत्न केला तर मी सर्वात आधी रस्त्यावर उतरेल, सामाजिक समतेचा विचार समाजात रुजविण्यासाठी हा महोत्सव – मस्के, आनंद शिंदेंच्या संगीत रजनीला बीडकरांची तुडुंब गर्दी


सामाजिक समतेचा विचार समाजात
रुजवण्यासाठी हा महोत्सव – राजेंद्र मस्के
आनंद शिंदेंच्या संगीत रजनीला बीडकरांची तुडूंब
गर्दी, ताईंसह भीमप्रेमींनी राजेंद्र मस्केंचेही केले कौतूक
बीड, दि. 22 (लोकाशा न्यूज) : भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी बीडमध्ये सुप्रसिध्द गायक आनंद शिंदे यांच्या आयोजित केलेल्या संगित रजनीच्या कार्यक्रमाला बीडकरांची तुडूंब अशी गर्दी पहायला मिळाली. यावेळी आनंद शिंदे यांनी पंकजाताई ही देशपातळीला जोडणारी एक हॉटलाईन आहे, ताई बीड जिल्ह्याची शान आहे, जिल्ह्याच्या हितासाठी, विकासासाठी लढणार्‍या या आपल्या ताईला क्षणोक्षणी जपा, असे संकेत आनंद शिंदे यांनी यावेळी दिले, तर संविधानाला नख लावण्याचा कोणी प्रयत्न केला तर मी सर्वात आधी रस्त्यावर उतरेल, असे पंकजाताईंनी यावेळी म्हटले.  विशेष म्हणजे यावेळी पंकजाताईसह भीमप्रेमींनी राजेंद्र मस्केंचेही भरभरून कौतूक केले.
संविधान महामानवाने दिलेले आहे. तो बदलण्याचा अधिकार या जगात कोणालाच  नाही. जर कोणी नख लावायचा प्रयत्न केला तर ही पंकजा मुंडे तुमच्या आधी रस्त्यावर उतरेन, असे आश्वासन भाजपा राष्ट्रीय सचिव आणि बीड लोकसभेच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांनी बीड येथे शिव फुले आंबेडकर जयंती निमित्त उपस्थित भीमप्रेमी नागरिकांना देत पुढे म्हणाल्या कि,  छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी त्यावेळी जाणीव करून दिली कि हि माती आपली आहे ही धरती आपली आहे. आणि परकीय आक्रमणाच्या विरोधात लढून स्वराज्य स्थापन करून, या मातीत  स्वातंत्र्याचे बीजारोपण केले. तर ज्यांनी स्वातंत्र्यात मिळाल्यानंतर या देशात राहणारा प्रत्येक माणूस कायद्याला समान आहे. हे तत्व देऊन देशाला सुंदर परिपूर्ण सहिष्णू संविधान दिले. ज्यांनी क्रांतीची ज्योत आणि क्रांतीचा सूर्य बनण्याचे काम केले. शिक्षणाचा महिलांना समान अधिकार दिला. अशा सर्व महामानवांना अभिवादन केले. भगवा, पिवळा, नीळा, हिरवा सर्व झेंडे एक व्हावे. आणि त्याचा रंग पांढरा व्हावा. समाजात असे चित्र असावे, समाजामध्ये शांती स्थापन व्हावी, अशी सदिच्छाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.  
गतवर्षी प्रमाणे भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या संकल्पनेतून विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, विश्वरत्न, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने शिव, फुले, आंबेडकर यांच्या संयुक्तिक जयंती महोत्सवानिमित्त ख्यातनाम भीमगीत गायक सम्राट आनंद शिंदे यांचा संगीत रजनी कार्यक्रम छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगन बीड येथे आयोजित करण्यात आला होता. भाजपा राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या  या सांस्कृतिक कार्यक्रमास भीम प्रेमी जनता व रसिक बीडकरांनी उदंड प्रतिसाद दिला. हजारोंच्या संख्येत उपस्थित असलेला अवघा भीमसागर ख्यातनाम गायक आनंद शिंदे यांच्या सुरेल सुरांनी मंत्रमुग्ध झाला. महापुरुषांच्या जयंतीनिमित्ताने महापुरुषांच्या विचारांचे जागरण व्हावे. त्यांचे चरित्र आणि कार्य युवा पिढीपर्यंत पोहचले पाहिजे. त्यांच्या विचाराची ओळख सुजाण नागरिकांना झाली पाहिजे. या उदात्त हेतूने हा संयुक्तिक जयंती महोत्सव साजरा करत आहोत. या महोत्सवातून  स्वातंत्र्य समता, बंधुता आणि सामाजिक समतेचा विचार समाजात निश्चितपणे रुजेल असा विश्वास व्यक्त करून राजेंद्र मस्के यांनी महापुरुषांच्या जयंतीनिमित्त सर्वाना शुभेच्छा दिल्या.  यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल दादा जगताप,  अ‍ॅड सर्जेराव तांदळे, नवनाथ शिराळे, रिपाई जिल्हा सचिव विलास जोगदंड, अशोक वाघमारे, शिवसंग्रामचे ऍड राहुल मस्के, विक्रांत हजारी, सुनील सुरवसे, डॉ.लक्ष्मण जाधव, अजय सवाई, ज्योतिबा नन्नवरे,रमेश चव्हाण, बाप्पासाहेब घुगे, इर्शाद भाई,  तुरुकमारे सर, सोमनाथराव माने, बालाजी पवार, मदन मस्के, अनिल चांदणे, अभय वणवे, दुष्यंत डोंगरे, पाल सिंगनकर काका, आदित्य सारडा, दादासाहेब गिरी, राजू शहाणे, दत्ता परळकर, कल्याण काका आखाडे, नानासाहेब शिंदे, शरद दुग्गड, संभाजी सुर्वे, उत्रेश्वर घोडके, कपिल सौदा, विलास जोगदंड, संग्राम बांगर, अमोल वडतीले, नितीन फड, जयश्रीताई मस्के, संध्याताई राजपूत, मीराताई गांधले, संगीता धसे, छायाताई मिसाळ, प्रीतताई कुकडेजा, शीतलताई राजपूत,आदी मान्यवर पत्रकार, व्यापारी, भाजपा व विविध राजकीय, सामाजिक विविध क्षेत्रातील तसेच पत्रकार बांधवांसह रसिक बीडकर बांधव मोठ्या संखेने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचलन मारुतीराव तीपाले यांनी केले. दरम्यान कार्यक्रम स्थळी ओपन जीप मधून, पंकजाताईंना व्यासपिठापर्यंत हलगीच्या गजरात नेण्यात आले. जय भीम, जय शिवराय, जय क्रांतीच्या घोषणा देत महिला अबाल वृद्धांनी हातात हात देऊन पंकजा मुंडेना शुभेच्छा दिल्या. गीत सम्राट आनंद शिंदे यांनी गायलेल्या गाण्याचे पंकजाताईंच्या हस्ते  प्रकाशन करण्यात आले.  काल  आनंद शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून उत्साहात त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

महिलांनी हातात हात देवून पंकजाताईंना
लोकसभेतील विजयासाठी दिल्या शुभेच्छा
यावेळी जय भीम, जय शिवराय, जय क्रांतीच्या घोषणा देत महिला अबाल वृद्धांनी हातात हात देऊन पंकजाताई मुंडेंना लोकसभेतील विजयासाठी शुभेच्छा दिल्या.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!