बीड

महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छासह मतदान करण्याचे पालकमंत्री धंनजय मुंडे यांनी केले आवाहन

बीड, दि.1: (जीमका) महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छासह मतदान करण्याचे आवाहन, राज्याचे कृषी मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी ध्वजारोहण प्रसंगी केले.

पोलीस कवायत मैदानावर झालेल्या या मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळ्यास जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे तसेच पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पाठक यांची विशेष उपस्थिती होती.

यावेळी ते म्हणाले की, महाराष्ट्र राज्य स्थापना दिनाचा आज राज्याचा ६५ वा वर्धापन दिन आणि सोबतच आंतरराष्ट्रीय कामगार दिन देखील आहे. आज या निमित्त जमलेल्या सर्वांना त्यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या.

ते पुढे म्हणाले, १०५ हुतात्म्यांच्या बलिदानानंतर आपल्या या महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली त्या सर्व हुतात्म्यांचे स्मरण करण्याचा हा दिवसआहे असे सांगून ते म्हणाले की, ज्यांनी प्राणांचे बलिदान देवून राज्याच्या निर्मितीसाठी सर्वोच्च योगदान दिले त्या सर्व हुतात्म्यांना नमन मी करतो .

महाराष्ट्र राज्य स्थापना होण्यापूर्वीपासूनच आपले राज्य हे पुरोगामी राज्य अशी ओळख आणि राज्य स्थापन झालानंतर त्यात उत्तरोत्तर प्रगती झाली आहे. याचा महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक नागरिकाला अभिमान आहे. असे ही ते यावेळी म्हणाले.

राज्याने सर्वच क्षेत्रात आपल्या या देशाला दिशा दाखवण्याचे काम केले आहे आणि हीच परंपरा यापुढील काळात आपण कायम ठेवण्याचा संकल्प या मंगलदिनी अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केले.

कामगार आणि कष्टक-यांच्या श्रमाची दखल घेण्याचा दिवस म्हणून आज आंतरराष्ट्रीय कामगार दिन साजरा होत आहे. सर्वच क्षेत्रात योगदान देणाऱ्या कामगारांना देखील त्यांनी शुभेच्छा दिल्या.

सर्वात मोठी लोकशाही असलेल्या आपल्या देशात लोकशाहीचा उत्सव सुरु आहे. काही भागात मतदान यापूर्वीच पार पडले आहे. लोकांनी लोकांसाठी चालविलेले लोकांचे राज्य अर्थात लोकशाही आणि याचा मुळ आधार म्हणजे मतदार असल्याचे सांगून,
आपल्या देशात प्रत्येक व्यक्तीला मतदानाचा अधिकार संविधानाने दिला आहे. हा अधिकार आपण आपले कर्तव्य म्हणून पार पाडले पाहिजे.
येणाऱ्या सोमवार दिनांक १३ मे रोजी प्रत्येक मतदाराने आपले हे कर्तव्य पार पाडावे आणि लोकशाही मजबूत करावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

0000

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!