बीड

संघर्ष कन्येच्या हातात विकासाची धार ! पाच वर्षाच्या सत्तेत बीड जिल्ह्याच्या विकासासाठी आणले 25 हजार कोटी, मंत्री पदाचा सर्वात जास्त फायदा बीड जिल्ह्यालाच झाला


बीड, दि. 30 (लोकाशा न्यूज) : लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या पावलावर पाऊल ठेवूनच मुंडे भगिणी सक्षमपणे काम करीत आहेत.  वंचितांच्या प्रश्‍नांसाठी जसा स्व. मुंडेंना संघर्ष करावा लागला अगदी तसाच संघर्ष सातत्याने पंकजाताईंना करावा लागत आहे, यामुळेच संघर्ष कन्या म्हणूनही पंकजाताईंकडे पाहिले जात आहे. वास्तविक पाहता याच संघर्ष कन्येच्या हातात विकासाची खरी धार असल्याचेही सातत्याने दिसून येत आहे. त्यांच्याकडील मंत्री पदाचा सर्वात जास्त फायदा बीड जिल्ह्यालाच झाला असून या पाच वर्षात बीड जिल्ह्याच्या विकासासाठी तब्बल 25 हजार कोटींहून अधिकचा निधी आलेला आहे. त्यामुळे आता पंकजाताई खासदार होवून केंद्रात मंत्री झाल्यास बीड जिल्ह्याच्या विकासाला मोठी गतीच मिळणार आहे.  यासाठी बीड जिल्हावासियांनी जातीपातीचे राजकारण बाजूला ठेवून त्यांच्या पाठीशी ताकतीने उभा रहाणे आवश्यक आहे.
एक मागास जिल्हा म्हणून बीड जिल्ह्याकडे पाहिले जाते, शरद पवारांनी या जिल्ह्याचा केवळ राजकारणासाठीच वापर केलेला आहे. मात्र शरद पवारांचा हा कुटील डाव सातत्याने मोडून काढण्याचे काम लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी केलेले आहे. स्व. मुंडेंनी बीड जिल्ह्याचे नाव देशाच्या नकाशावर आणलेले आहे. या जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य पणाला लावले, नगर-बीड-परळी रेल्वेचा प्रश्‍नही आज खर्‍या अर्थाने त्यांच्याच नावामुळे मार्गी लागलेला आहे. आज त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून मुंडे भगिणी बीड जिल्ह्याच्या विकासासाठी धडाडीने काम करत आहेत. विशेष म्हणजे राज्यातील ग्रामविकास मंत्री, जलसंधारण मंत्री, महिला व बालकल्याण मंत्री असताना पंकजाताईंनी बीड जिल्ह्याच्या विकासासाठी हजारो कोटींचा निधी आणला, त्यांच्या काळात जवळपास 25 हजार कोटींहून अधिक रूपयांची कामे झालेली आहेत. चौदा राष्ट्रीय महामार्गांच्या माध्यमातून संपूर्ण बीड जिल्हा देशाला जोडण्याचे काम याच संघर्ष कन्येने खर्‍या अर्थाने केलेले आहे. बीडकरांच्या जिव्हाळ्याचा असणारा नगर-बीड-परळी रेल्वे मार्गाचेही काम त्यांनीच मार्गी लावलेले आहे. लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचा ड्रीम प्रोजेक्ट अशी नोंद देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या डायरीत करून या रेल्वे मार्गावर निधीचा वर्षाव केलेला आहे. पंकजाताईंनी ग्रामीण रस्तेही आपल्या ग्रामविकास खात्यातून चकाचक केली, ज्या गावांना स्वतंत्र मिळून 70 वर्षे झाली तरीही तिथे रस्ता नव्हता त्या गावांना रस्ते (मुख्यमंत्री ग्राम सडक योजना) तर दिलेच मात्र त्या गावांना कोट्यावधींचा निधी देवूनही ती गावे विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम पंकजाताईंनी खर्‍या अर्थाने केलेले आहे. याच ग्रामविकास खात्यातून त्यांनी बीडमध्ये झेडपीची टोलेजंग अशी ईमारत बांधून बीड शहराच्या वैभवात मोठी भरच टाकलेली आहे. याबरोबरच तालुकास्तरावरही त्यांनी पंचायत समित्यांच्या टोलेजंग अशा ईमारती उभा केलेल्या आहेत. यावेळी पंकजाताईंनी ना कुणाची जात पाहिली ना विरोधकांचा पक्ष. नितिमत्ता चांगली ठेवून पंकजाताईंनी बीड जिल्ह्याच्या विकासासाठी निधीचा वर्षाव केला. पंकजाताईंनी बीड जिल्ह्याच्या विकासासाठी आणलेला हाच निधी पाहून विरोधकही अवाक व्हायचे, 25-15 मधून गावांचा विकास करता येतो, असे खर्‍या अर्थाने पंकजाताईंच्याच काळात जिल्ह्याला पहायला मिळाले, कारण ताईंनी मागेल त्याला हा निधी देण्याचे काम केले होते, एवढेच नव्हे तर कायम दुष्काळ असणार्‍या बीड जिल्ह्याला ताईंनी जलयुक्त शिवार ही योजना राबवून जिल्ह्याला दुष्काळातून बाहेर काढले. पंकजाताईंच्या मनामनात नितिमत्ता आहे, बीड जिल्ह्याचा विकासच हाच ध्यास फक्त त्यांच्या मनात आहे, त्या जाणून बुजून कधीच कुणाचे नुकसान करू शकत नाहीत, याचा अनुभव बीड जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांना आहे, त्यामुळेच त्यांच्या माध्यमातून आता एक सक्षम असा खासदार बीड जिल्ह्याला मिळणार आहे. देशात पुन्हा एखदा मोदीच पंतप्रधान म्हणून शपथ घेणार आहेत. मोदींच्या नव्या होणार्‍या मंत्रिमंडळात पंकजाताई ह्या मंत्री म्हणून शपथ घेणार असल्याचे भाजपकडून सांगितले जात आहे. त्यामुळे पंकजाताईंच्या येणार्‍या काळाचा बीड जिल्हावासियांना मोठा फायदाच होणार आहे. येणार्‍या एक वर्षात बीड रेल्वेचे काम परळीपर्यंत पोहचणार आहे. येणार्‍या काळात बीड जिल्ह्यातील तरूणांच्या हाताला रोजगार देण्याचा संकल्पही पंकजाताईंनी केलेला आहे. त्यामुळे बीड जिल्ह्याच्या विकासासाठी, बीड जिल्ह्याच्या हितासाठी जिल्हावासियांनी संघर्षकन्येच्या लोकसभेतील या लढ्याला बीडकरांची खंबरीपणे साथ असणे आवश्यक आहे. जातीपातीचे राजकारण बाजूला ठेवून केवळ बीड जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वांना पंकजाताईंचे हात मजबूत करावे लागणार आहेत, अशी भावना बीड जिल्ह्यातील प्रत्येकाच्या मनामनात आहे.

आघाडी सरकारने 400 कोटींचा निधी रोखला
नसता तर आज रेल्वे बीडपर्यंत धावली असती
नगर-बीड-परळी रेल्वे मार्गाचे काम तातडीने पुर्ण व्हावे, यासाठी मागील दहा वर्षांपासून मुंडे भगिणी प्रयत्न करीत आहेत. त्यांच्याच प्रयत्नामुळे हे काम आज पुर्णत्वाकडे जात आहे. मात्र मध्यंतरी आघाडी सरकारने या कामाचे पावने चारशे कोटी रूपये रोखून धरले होते, अडीच वर्ष हे काम रेंगाळत ठेवण्याचे काम आघाडी सरकारने केले, जर आघाडी सरकारने हे पावने चारशे कोटी रूपये दिले असते तर आज बीडपर्यंत रेल्वे धावू लागली असती, आडवलेल्या या निधीसाठीही मुंडे भगिणींनी सातत्याने आवाज उठविला, पुढे सुदैवाने राज्यात भाजपचे सरकार आले आणि पुन्हा नगर बीड परळी रेल्वे मार्गाला राज्य सरकारकडून झपाट्याने निधी मिळू लागला.

पंकजाताईंच्या एका निर्णयाने जिल्ह्यातील
शेतकर्‍यांच्या खात्यात आले कोट्यवधी रूपये
पंकजाताई पालकमंत्री असताना जिल्ह्यातील शेतकर्‍यांना अनुदान आणि विमा मोठ्या प्रमाणात मिळालेला आहे, येणार्‍या याच पैश्यामुळे शेतकरी सातत्याने आपले पासबुक घेवून बँकेत जावून पैसे काढत होता, नेता असावा तर तो पंकजाताईंसारखा, अशी चर्चाही यावेळी शेतकर्‍यांमध्ये होत होती, जिल्ह्यातील शेतकर्‍यांना चांगले दिवस आणण्याचे काम ताईंनी खर्‍या अर्थाने केले, त्यामुळे या लोकसभा निवडणूकीत जिल्ह्यातील शेतकरीही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभाच राहणार असल्याचे दिसून येत आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!