बीड

पंकजाताई मुंडे यांना लोकसभेत पाठवणे आमची नैतिक जवाबदारी, परळी शहरातील विविध समाज घटकांच्या बैठकीत खा. प्रितमताईंना मतदारांची ग्वाही, सुवर्णकार समाज, भावसार समाजासह वकील संघाचा पंकजाताईंना बिनशर्त पाठींबा

परळी । दि. ३० ।
बीड जिल्ह्यातील सर्वसमाज घटकांना एकत्र करून विकासाची विविध लोकाभिमुख कामे केल्यामुळे पंकजाताईंच्या माध्यमातून राज्यात आणि देशात परळीचे नाव उंचावले आहे. राज्याच्या मंत्री म्हणून काम करताना लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या प्रमाणे सर्वांना सोबत घेऊन वंचित, उपेक्षित, दुर्लक्षित घटकांना पंकजाताईंनी न्याय देण्याचं काम केल आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, जलयुक्त शिवार, महिला बचत गट इत्यादी योजनांच्या माध्यमातून आम्हाला नवी ओळख मिळवून देणाऱ्या कर्तबगार लेकीला परळीकर म्हणून लोकसभेत पाठवण्याची नैतिक जवाबदारी आमची आहे आणि ही जवाबदारी आम्ही नेकीने पार पाडू अशी ग्वाही परळी शहरातील मतदारांनी खा. प्रितमताई मुंडे यांना दिली.

भाजप आणि महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारानिमित्त खा. प्रितमताई मुंडे यांनी परळी शहरातील वकील संघ, सुवर्णकार समाज आणि भावसार समाजाच्या बैठकीत मतदारांशी संवाद साधला. विकासाचा दृष्टिकोन आणि नेतृत्व करण्याची सक्षमता असलेल्या उमेदवार म्हणून पंकजाताई मुंडे यांच्या पाठीशी मतदानरुपी आशीर्वाद उभे करून लोकसभेच्या विजयात मताधिक्याच योगदान दया असे आवाहन खा. प्रितमताई मुंडे यांनी केले.

दरम्यान परळी शहरातील भावसार समाजातील प्रतिष्ठित नागरिकांनी पंकजाताई मुंडे यांना बिनशर्त पाठींबा देऊन संपूर्ण जिल्ह्यातून शंभर टक्के मतदान मिळवून देऊ असा शब्द भावसार समाजाच्या वतीने दिला. तर सुवर्णकार समाजाने पंकजाताई मुंडे यांना पाठींबा देऊन परळीच्या लेकीला सन्मानजनक मताधिक्य देऊन लोकसभेत पाठवण्याचा निर्धार व्यक्त केला.

सुज्ञ मतदार पंकजाताईंच्या विकासाभिमुख नेतृत्वासोबत

परळी वकील संघाच्या बैठकीत शहरातील जेष्ठ विधिज्ञांनी वकील संघ पंकजाताई मुंडे यांच्या पाठीशी असल्याचे सांगताना जातीपातीच्या राजकारणाला थारा न देता परळीच्या लेकीला सन्मानजनक विजय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. बीड जिल्ह्यातील सुज्ञ मतदार हा नेहमीच विकासाच्या मुद्द्यावर सक्षम नेतृत्वाच्या पाठीशी राहिला आहे, उमेदवाराची नेतृत्व क्षमता, विकासाचे ध्येयधोरण, भविष्याची गरज बघून मतदान करणारा वर्ग पंकजाताईंच्या पाठीशी आहे, सर्वांगीन विकासाचे व्हिजन असलेल्या उमेदवार म्हणून सुज्ञ मतदार पंकजाताईंच्या विकासाभिमुख नेतृत्वासोबत असल्याची भावना या बैठकीतून पुढे आली.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!