बीड

अखेर लिंगपिसाट शिक्षक आमेर काझीवर गुन्हा दाखल


बीड, दि. 9 (लोकाशा न्यूज) : अंजुमन इशात ए तालीम या संस्थेच्या मिलिया शाळेत आमेर काझी या शिक्षकाने शाळेतील काही महिला शिक्षिकासोबत शाळेच्या वर्गखोली मध्ये सेक्स केल्याचे प्रकरण दै. लोकाशाने उघडकीस आणले होते. गेल्या एक दिड महिनाभर पासून दै. लोकाशाने हा विषय लावून धरला होता.अखेर मिलिया शाळेच्या मुख्याध्यापक यांच्या फिर्यादीवरून लिंगपिसाट शिक्षक आमेर काझीवर बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीड येथील मिलिया शाळेतील शिक्षक आमेर काझी याने आपल्या शाळेतील काही शिक्षिका यांच्यासोबत अश्लील चाळे केल्याचे प्रकरण दै. लोकाशाने उघडकीस आणले होते. आमेर याने 2012 ते 2023 या काळात शाळेतील शिक्षिका व इतर महिला सोबत शारीरिक संबंध ठेवले. हे करताना त्याने याचे व्हिडीओ तयार केले. हे व्हिडीओ त्याने काही पॉर्न साईटला विकल्याचे माध्यमांनी ठामपणे म्हटले होते.या प्रकरणात सुरवातीला आमचा काही संबंध नाही,आमच्या शाळेचा, संस्थेचा यात सहभाग नाही असा दावा संस्थाचालकांनी केला होता. मात्र माध्यमांनी या प्रकरणात सातत्याने प्रकाश टाकून या शाळेतील हे सेक्स रॅकेट उघडकीस आणले होते, तरीदेखील शाळेचे व्यवस्थापन यावर गंभीर नव्हते.समाजाने या प्रकरणात संस्थेला जाब विचारला.शेकडो विद्यार्थ्यांनी आपले दाखले काढून दुसर्‍या शाळेत ऍडमिशन घेतले. आमेरच्या या कुटाण्यात संस्था आणि काही शिक्षक,शिक्षिका दोषी असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर संस्थेने आमेर यांच्यासह तीन शिक्षकांना निलंबित केले तर दोघी जणींना व्ही आर एस घेण्यास भाग पाडले.म्हणजेच माध्यमांनी वेळोवेळी जो दावा केला होता तो सत्य होता हे सिद्ध झाले आहे. दरम्यान शनिवारी सायंकाळी पाच वाजल्यापासून काही संस्थाचालक आणि मुख्याध्यापक बीड शहर पोलिसात बसून होते. रात्री उशिरा या प्रकरणात आमेर काझी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!