बीड

पंकजाताईंना एकटे पडू देणार नाही- बाबुराव पोटभरे, बहुजन विकास मोर्चाचा पंकजाताई मुंडे यांना पाठिंबा, जिल्ह्यातील दलित समाजाची ताकद पंकजाताईंच्या पाठिशी उभा करणार

बीड, दि.३०( लोकाशा न्यूज ) भाजपा नेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या कन्या पंकजाताई मुंडे यांना लोकसभा निवडणुकीत एकटे पडू देणार नाही, जिल्हयातील कार्यकर्त्याच्या भावना विचारात घेऊन, बहुजन विकास मोर्चाने पंकजाताई मुंडे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असून, पंकजाताई मुंडे यांच्या पाठिशी संपूर्ण ताकद उभी करू, असे बहुजन विकास मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष बाबुराव पोटभरे यांनी सांगितले.

बीड लोकसभा निवडणुकीत बाबुराव पोटभरे यांच्या भूमिकेकडे जिल्हयातील जनतेचे लक्ष लागले होते. वडवणीतील आनंद मंगल कार्यालयात मंगळवारी बहुजन विकास मोर्चाच्या जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचा मेळावा बाबुराव पोटभरे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्यांनी आपले विचार व्यक्त केले. बाबुराव पोटभरे हे बांधतील तेच तोरण व ते सांगतील तेच धोरण, त्यामुळे वरिष्ठांनी निर्णय घ्यावा, असे बैठकीत ठरले, त्यानंतर बाबुराव पोटभरे यांनी आपले सडेतोड विचार मांडून, सध्याची राजकीय स्थिती पाहता, भाजपा उमेदवार पंकजाताई मुंडे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केला. पंकजाताई मुंडे यांना एकटे पडू देणार नाही, आपली संपूर्ण ताकद पंकजाताईच्या पाठिशी उभी करू, असे पोटभरे यांनी सांगितले. उपस्थित कार्यकर्त्यांनी या निर्णयाचे स्वागत केले.

यावेळी प्रशांत ससाणे, श्रीहरी मोरे, जय तांगडे, सचिन डोंगरे, विनोद शिंदे, विलास जावळे, सुनील जाधव, प्रकाश कोकाटे, बाबासाहेब साळवे, बाबासाहेब वाघमारे, किशोर चोपडे, मनोहर मुंडे, लखन हजारे, प्रदीप पट्टेकर, सदानंद प्रधान, भीमराव टाकणखार, नवनाथ धाईजे यांच्यासह जिल्हाभरातील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते .


लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!