बीड

राजकारणात जाती-पातीचे उगवलेले तण काढून फेकून द्या, मला दिलेलं प्रत्येक मत जिल्ह्याच्या विकासाला जाईल ; ही संधी वाया घालू नका – पंकजाताई मुंडेंनी घातली साद, पंकजाताई मुंडे यांचा घाटनांदूर, पट्टीवडगांव, बर्दापूर सर्कलमध्ये झंझावात

अंबाजोगाई ।दिनांक २६।
लोकसभा निवडणुकीत विरोधकांकडे कोणताही अजेंडा नाही, त्यामुळेच ते जातीपातीचे राजकारण पुढे करत जनतेमध्ये बुद्धिभेद करण्याचे काम करत आहेत. भाजप महायुतीच्या कार्यकर्त्यांनी गावागावात जाऊन आपल्या विकासाचं व्हीजन मतदारांपर्यंत जाऊन सांगावं. तुमचं मला मिळालेलं प्रत्येक मत हे जिल्हयाच्या विकासाला जाणार आहे, त्यामुळे ही संधी वाया घालू नका. पुढील पाच वर्षे सेवा करण्यासाठी आशीर्वाद द्या असं आवाहन भाजपा महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांनी केलं आहे.

पंकजाताई मुंडे यांनी आज मतदारसंघातील घाटनांदुर, पट्टीवडगांव, बर्दापूर, राडी सर्कलमधील गावांचा झंझावती दौरा करून मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी घेतल्या तसेच महायुतीच्या कार्यकर्त्यांशी देखील संवाद साधला त्यावेळी त्या बोलत होत्या. घाटनांदुर, सायगाव, वाघाळा, हनुमंतवाडी, तळणी, हातोला, जवळगाव, पुस, तळेगाव येथे मतदारांशी गाठीभेटी घेत संवाद साधला. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष अच्युत गंगणे, राष्ट्रवादीचे गोविंद देशमुख,बन्सी अण्णा सिरसाट, घाटनांदुरचे सरपंच महेश गारठे, वैजनाथ आप्पा गारठे, शिवाजी सिरसाट, शाम आपेट, नेताजी देशमुख, गणेश कराड, गोपाळराव दरगड, दिलीप गिते यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भाजपा महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र टीम करावी. दोन्ही पक्षाच्या गट व गण प्रमुखांनी गणांचा दौरा करून मतदारांशी थेट भेटावं असं सांगत पंकजाताई मुंडे म्हणाल्या, मी मंत्री असताना मतदारसंघांत खूप निधी दिला, सत्ता गेल्यावर अडीच वर्षे मी दिलेलीच कामे सुरू होती. मतदारसंघातील सगळ्याशी माझे ऋणानुबंध आहेत. हक्काने तुम्ही मला सर्व सांगू शकता. सर्व स्थिती सकारात्मक आहे त्यामुळे अशी संधी परत येणार नाही. मला राजकारणाचा आणि प्रशासनाचा अनुभव असल्याने याचा उपयोग विकासासाठी करत राहील. मागील पाच वर्षांत पद नसतांना लोकांशी अटेचमेन्ट ठेवली. बरीच कामे केली. इथला रेल्वेचा थांबा पूर्ववत करून देऊ.काहीच अडचण येणार नाही. खासदार झाल्यास पंतप्रधान मोदींकडून मी हक्काने काम करून घेऊ शकते. याचा आपल्या जिल्हयाला फायदाच होईल.

जातीपातीचे तण काढून फेका

राजकारणात जाती-पातीचे खूप तण सध्या उगवले आहे ते तण काढून फेकून द्या. आलेली संधी वाया घालू नका. विरोधक बुद्धिभेद करतील, कारण त्यांचेकडे दुसरा अजेंडा नाही. मुस्लिम, मराठा समाज बांधवांना विकासाचे व्हिजन समजावून सांगा. तुम्ही संधी दिल्यास जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलून टाकील असा विश्वासही पंकजाताई मुंडे यांनी यावेळी व्यक्त केला. आपल्याला मुंडे साहेबांचे अधुरे स्वप्न पूर्ण करायचे आहे. हे विसरू नका त्यामुळे अधिकाधिक मताधिक्य मिळवण्यासाठी कार्यकर्त्यांनी एक दिलाने काम करावे. असे आवाहनही पंकजाताईंनी केले.

तुमच्या मतातून जिल्ह्याचा विकास साधणार

मंत्री असताना मी कधी कुणाला त्रास दिला नाही.जातीवादाला थारा दिला नाही त्यामुळे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी मला पुढची पाच वर्षे सेवा करण्याची संधी द्या.तुमचे मत वाया जाऊ देणार नाही जिल्ह्याचा विकास करून तुमच्या मताची परतफेड करेन असा विश्वास याप्रसंगी पंकजाताई मुंडे यांनी व्यक्त केला.

सायगावला दर्ग्यात चादर चढवून घेतले दर्शन ; मुस्लिम बांधवांशी मनमोकळा संवाद

आजच्या दौऱ्यात पंकजाताई मुंडे यांनी सायगाव येथील दर्ग्यात चादर चढवून दर्शन घेतले. यावेळी तिथल्या धर्मगुरूंचे आशीर्वाद घेतले. तसेच उपस्थित मुस्लिम बांधवांशी संवाद साधला. घाटनांदुरकडे मार्गस्थ होत असताना तळणी, हनुमंतवाडी येथील ग्रामस्थांनी वाहनाचा ताफा थांबवून पंकजाताईंचे स्वागत केले.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!