बीड

जिजाऊंच्या माहेराहून खा. प्रतापराव जाधव पंकजाताई मुंडेंच्या प्रचारासाठी बीडमध्ये, पंकजाताईंच्या एका सभेमुळे आम्ही निवडून येतो – खा. जाधव

बीड ।दिनांक ६।
राष्ट्रमाता जिजाऊंचे माहेर असलेल्या बुलढाणा जिल्हयाचे खासदार आणि शिवसेनेचे लोकसभेचे उमेदवार खासदार प्रतापराव जाधव भाजपा महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारासाठी आज बीडमध्ये आले. पंकजाताईंच्या एका सभेमुळे माझ्यासारखे अनेक नेते निवडून येतात अशा शब्दांत त्यांनी पंकजाताईंचा नेतृत्व बीडसाठी किती महत्वाचे आहे हे अधोरेखित केले.

पंकजाताई मुंडे यांच्या राज्यभरातील जनसंपर्कमुळे त्यांना मानणारा प्रचंड मोठा वर्ग एका शब्दावर विश्वास ठेवत तो देतील तो उमेदवार निवडून आणतात हा आमचा अनुभव आहे. माझ्यासारखे अनेक जण पंकजाताई मुंडे यांच्या सक्षम नेतृत्वामुळे लोकसभा निवडणूक असो की विधानसभा या निवडणुकीत विजयी होतात. पंकजाताई आमच्यासाठी सभा घेतात त्यामुळे त्या निवडणूक लढवत असलेल्या बीड जिल्ह्यात मासाहेब जिजाऊंच्या माहेरातून प्रतापराव जाधव हे खास पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारासाठी आज पिंपळनेर येथे आले होते.

भाजप-महायुतीच्या बीड लोकसभेच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांनी त्यांच्या प्रचारार्थ संपूर्ण जिल्हा पिंजून काढला आहे.ठीकठिकाणी होणाऱ्या बैठका, पदयात्रा जाहीर सभा या सर्वच ठिकाणी मतदारांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. पंकजाताई मुंडे या लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या विचारांचा वारसा घेऊन समाजकारण आणि राजकारण समर्थपणे करत आहेत. सर्व,धर्म,समभाव ही शिकवण घेऊन पंकजाताई सर्व जाती धर्माच्या लोकांना सन्मान देऊन विकासाचे राजकारण करतात.
गेले कित्येक वर्ष आम्ही दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब आणि त्यांच्यानंतर पंकजाताईंच्या नेतृत्वाखाली काम करत आहोत. बीड लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच पंकजाताई मुंडे सामोरे जात आहेत. पंकजाताईंच्या एका सभेमुळे माझ्यासारखे अनेक जण निवडून येतात हा इतिहास आहे. त्यांचे विचार, काम करण्याची पद्धत आणि उस्फुर्त भाषण मतदारांना भावते.

पंकजाताईंमुळे आम्ही निवडून येतो

भाजप महायुतीकडून लोकसभा निवडणुकीला सामोरे जाणारे सुजय विखे पाटील, खा. रावसाहेब दानवे पाटील असो की, सुधाकर शृंगारे, बबनराव लोणीकर तानाजी मुटकुळे, मेघनाताई बोर्डीकर असे कितीतरी नेते पंकजाताईंमुळे निवडून येतात हा इतिहास आहे. आज त्यांच्यासाठी आम्ही प्रचारात उतरलो आहोत. त्या विक्रमी मताधिक्य घेऊन विजयी तर होणारच आहेत पण त्यांच्या पाठिशी आपण सर्व जण एकजुटीने उभे रहावे. जिल्ह्यासाठी त्यांच्या नेतृत्वाची आवश्‍यकता असल्याचे जाध. यांनी म्हटले आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!