बीड

पंकजाताई मुंडे यांच्या विजयासाठी मराठा युवकाचे समाज बांधवांना आवाहन, विजयकुमार खोसे यांनी काढला बीड जिल्हा पिंजून, ताईंच्या पाठीशी जिल्हा ताकतीने उभा राहू लागला

परळी वैजनाथ दि. 4
बीड लोकसभा मतदार संघातील भाजपा- शिवसेना- राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्या विजयासाठी एक मराठा युवक बीड जिल्ह्यातील समाज बांधवांना भेटून पंकजाताई मुंडे यांनाच विजयी करण्याचे आवाहन करतो आहे. विजयकुमार खोसे असे या युवकाचे नाव असून त्याने अक्षरशः संपूर्ण बीड जिल्हा पिंजून काढला आहे पंकजाताई मुंडे यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचा दावा त्याने केला आहे.
पंकजाताई मुंडे यांना विक्रमी मताधिक्य मिळावे म्हणून अनेक जण आपापल्या परीने प्रयत्न करीत आहेत. परळीतील युवक विजयकुमार खोसे हा ही याच पद्धतीने मराठा समाजामध्ये प्रचार करताना दिसत आहे. बीड जिल्ह्याच्या विकास करण्याची क्षमता केवळ पंकजाताई मुंडे यांच्यामध्ये असून मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी ही त्या सकारात्मक आहेत. जाणीवपूर्वक त्यांच्या विरोधात विष पेरणाचा प्रयत्न काही जणांकडून केला जात असून तो चुकीचा असल्याचेही खोसे यांनी सांगितले. मराठा समाजामध्ये ही पंकजाताई मुंडे यांना मानणारा मोठा वर्ग असून त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. मी बीड जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये अनेक कुटुंबांना फोन करून आणि प्रत्यक्ष भेटून संवाद साधला असुन समाजामध्ये मोठ्या प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
विजयकुमार खोसे हे खाजगी नोकरी करत असून यानिमित्त त्यांचा जिल्हापर मोठा संपर्क आहे. पंकजाताई मुंडे यांच्या विजयासाठी त्यांनी बीड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन व्यापारी मेकॅनिक अदींच्या भेटी घेऊन पंकजाताई मुंडे यांनाच मतदान करावे असे आवाहन ते करीत आहेत. विजयकुमार खोसे यांनी आतापर्यंत बीड माजलगाव सिरसाळा वडवणी दिंद्रुड तेलगाव आदी गावांमध्ये भेटी घेऊन मतदारांशी सवांद साधला.
पंकजाताई यांच्यामुळे बीड जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळाली असून आगामी काळातही सिंचनासारखे महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे त्यामुळे मराठा बांधवांनी कुणाच्याही भूलथापांना बळी न पडता वस्तुस्थिती लक्षात घेऊन पंकजाताई मुंडे यांच्या पाठीशी आपली ताकद उभे करावी अशी आवाहनही त्यांनी केले.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!