बीड

गूढ आवाजाने चौसाळा परिसर हादरला


  चौसाळा- मंगळवारी सकाळी ११.०७ मिनिटांनी चौसाळ्यासह परिसर भूगर्भात झालेल्या स्फोटामुळे हादरला गेला जवळपास दोन मिनिट या स्फोटाची कंपण जाणवली गेली.

भूगर्भातून होणाऱ्या स्फोटांची मालिका हा नेहमीचा विषय झाला आहे. मंगळवारी सकाळी भूगर्भातून मोठा स्फोट झाल्याचा आवाज आल्याने जमिनीमध्ये जवळपास दोन मिनिटं कंपण जाणवत होती.आकाशातही विमान जात असल्यासारखा भास निर्माण झाला होता. लातूर परिसरात झालेल्या विध्वंसकारी भूकंपाच्या आठवणी गाठीशी असल्यामुळे जनतेमध्ये या नेहमी होणाऱ्या स्फोटामुळे भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. आज झालेल्या स्फोटाचा आवाज जामखेड तालुक्याचा काही भाग केजचा काही भाग तसेच धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यापर्यंत ऐकायला मिळाला. या भागात देखील जमिनीमध्ये काही भूकंप‌ सदृश्य कंपण जाणवली. या वारंवार होणाऱ्या स्फोटांचा भूगर्भ शास्त्रज्ञांनी अभ्यास करून जनतेच्या मनातील शंका दूर कराव्यात अशी मागणी होऊ लागली आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!