बीड

बीडमधील बालगृह, बालकाश्रमाची आयोगाकडून झाडाझडती, बालकांना चांगल्या आणि दर्जेदार सुविधा द्या, बाल हक्क संरक्षण आयोगाच्या सदस्या प्रज्ञा खोसरे यांच्या कडक सूचना


बीड, दि. 27 . प्रत्येक बालकांचे सुरक्षा आणि त्यांचे हित आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचे असते त्या अनुषंगाने बीड येथे महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या सदस्य प्रज्ञा खोसरे यांनी बालगृह, बालकाश्रम सरप्राईज व्हिजिट केली. त्यावेळी तेथील बालकांची स्वतः संवाद साधत मुलांना तिथे काही त्रास नाही ना, त्यांना व्यवस्थित जेवण मिळते का? दररोजच्या दैनंदिन गोष्टी मुलांना व्यवस्थित मिळतात का? शिक्षण घेत असताना त्यांना काही अडचणी येतात का?या संदर्भात चर्चा केली त्याचबरोबर त्यांच्या राहण्याच्या प्रत्येक रूम्स, स्टोर रूम, जेवणाची व्यवस्था असलेल्या रूम, स्वच्छतागृह, अभ्यास करण्यासाठी मुलांना असलेले ठिकाण या सर्व गोष्टीची पाहणी केली. काही बालक आश्रममध्ये मुलाच्या सुरक्षितेविषयी काही त्रुटी आढळल्या त्या संदर्भात संस्थाचालकांना तशाप्रकारे सूचना देण्यात आल्या, कारण मुलांच्या सुरक्षेतेबाबत आणि त्यांच्या हक्काबाबत कोणताच हलगर्जीपणा नको हे त्यांचे मत होते काही बालकाश्रमातील हलगर्जीपणामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली.तरीही काही बालगृहातील उत्तम स्थिती, स्वच्छता आणि बालकांकडे प्रकर्षाने दिलेले लक्ष यामुळे बाल हक्क संरक्षण आयोगाच्या सदस्य अँड प्रज्ञा खोसरे यांनी काही बालगृहांचे आयोगातर्फे कौतुकही केले कारण आपलं देशाचे येणारे भवितव्य म्हणजे ही सर्व बालके आहेत ते सुदृढ आणि सशक्त आणि शिक्षणाच्या प्रवाहात राहिली तरच आपल्या देशाचे भवितव्य उज्वल होईल असे त्यांनी आपले मत व्यक्त केले. त्याप्रसंगी चाईल्ड लाईनच्या जगताप ताई,शहराध्यक्ष पुनम ताई वाघमारे, संस्थाचालक,केअरटेकर उपस्थित होते.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!