बीड

आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घ्यावी, जिल्हाधिकार्‍यांच्या कडक सुचना, निवडणूक कामांसह पाणी टंचाईचाही घेतला आढावा


बीड, दि. 23 (लोकाशा न्यूज) : जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंडे यांनी पाणी, चारा टंचाई, मनरेगा तसेच 39 बीड लोकसभा निवडणूकच्या अनुषंगाने 230 – बीड विधानसभा मतदार संघाची आढावा बैठक मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील तहसील कार्यालयात शुक्रवारी झाली.
या बैठकीस जिल्ह्यातील सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कविता जाधव, तहसीलदार नरेंद्र कुलकर्णी, सुहास हजारे तसेच विविध विभागांचे कार्यालयीन प्रमुख यावेळी उपस्थित होते. यावेळी बीड तालुक्यातील पाणी, चारा टंचाई तसेच निवडणूक ही संदर्भात केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला आणि नागरिकांना पाण्याची कमतरता होणार नाही याची दक्षता घ्यावी असे निर्देश दिले. जिल्ह्यात चारा वाहतूक बंदी असून पशुधनाला चाराने कमी पडणार नाही याची काळजी घ्यावी असे सांगितले.  निवडणुकीच्या काळात महात्मा गांधी रोजगार हमी योजना अंतर्गत अपूर्ण कामे पूर्ण केली जाऊ शकतात त्यामुळे या अंतर्गत असणारी कामे सुरू ठेवण्याबाबत निर्देशित केले. बीड  जिल्ह्यातील 230 बीड  विधान सभा मतदारसंघात  आचारसंहितेचे सर्व नियमांचे पालन व्हावे तसेच कुणीही आदर्श आचारसंहितेच भंग होणार नाही याची काळजी घ्यावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी यांनी यावेळी केल्या. विविध निवडणूक कक्षाला यावेळी जिल्हाधिकारी यांनी भेट दिली.  

बीड विधानसभा मतदारसंघाच्या
स्ट्राँग रूमची पाहणी
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने 39 बीड लोकसभा मतदारसंघातील 230 बीड विधानसभा मतदारसंघाची स्ट्राँग रूम कृषी उत्पन्न बाजार समिती येथे असणार आहे. या जागेची आज जिल्हाधिकारी यांनी पाहणी करून पूर्वतयारीचा आढावा घेतला. तसेच गव्हर्नमेंट पॉलीटेक्निक येथे 39 बीड मतदार संघाच्या  मतदानानंतर म्हणजे 13 मे नंतर ते मतमोजणी म्हणजे 4 जूनपर्यंत ईव्हीएम मशीन येथे राहणार असून या जागेची पूर्वतयारी कशी सुरू आहे याचाही आढावा काल जिल्हाधिकारी यांनी घेतला.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!