बीड

तहसीलदार अविनाश शिंगटेंना बीडला नियुक्ती ; सोमवारी घेणार पदभार

बीड, दि.15 (मुकेश झनझने):-  लोकसभा  निवडणुकीच्या अनुषंगाने राज्य सरकारने नुकत्याच तहसीलदार संवर्गातील अधिकाऱ्यांना बदलीने पदस्थापना दिल्या आहेत.  यामध्ये बीड जिल्हाधिकारी कार्यालयात तहसीलदार ( महसूल-1) या पदावर तहसीलदार अविनाश शिंगटे यांना नियुक्ती देण्यात आली आहे. तहसीलदार शिंगटे यांनी यापूर्वी बीडचे तहसीलदार म्हणून काम पाहिलेले आहे. आता पुन्हा त्यांना बीडमध्ये नियुक्ती मिळाली असून बीड जिल्हाधिकारी कार्यालयात तहसीलदार ( महसूल-1) या पदावर ते काम करणार आहेत. दरम्यान, सोमवारी पदभार घेणार असल्याचे श्री. शिंगटे यांनी सांगितले.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!