बीड

बीडमध्ये दहा दिवसाचे लॉकडाऊन?; उद्या घोषणा होण्याची शक्यता

बीड, दि.२३ (लोकाशा न्यूज) : जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्ह्यात दहा दिवसाचे लॉकडाऊन केले जाणार असल्याची शक्यता आहे. मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व विभागाच्या प्रमुखांची या संदर्भात चर्चा झाली असून दि.26 मार्चच्या मध्यरात्रीपासून दि. 4 एप्रिलपर्यंत असे दहा दिवसाचे लॉकडाऊन करण्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी उद्या बुधवारी दि.24 मार्च रोजी पत्रकार परिषद आयोजित केली असून या पत्रकार परिषदेत लॉकडाऊनची घोषणा होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात आली आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!