बीड

पंकजाताई मुंडे यांनी गेवराईतील बुथप्रमुखांना केले चार्ज, विकास आणि विश्वास हेच आमचे नाते – पंकजाताई मुंडे,लोकनेते मुंडे साहेबांनी खूप प्रेम दिलयं, त्या ऋणाची परतफेड करूया – आमदार लक्ष्मण पवार

गेवराई ।दिनांक २८।
विकास आणि विश्वास हेच आमचे नाते राहीले असून लोकनेते मुंडे साहेबांनी जातीचे गणित मांडून कधी राजकारण केले नाही. मात्र, सध्या जिल्हयात विरोधक
अपप्रचार, बुद्धीभेद करून दोन समाजात तेढ निर्माण करीत आहेत. तथापि, जिल्ह्य़ातील मायबाप जनतेने जातीय रंग देणाऱ्यांना धडा शिकवून, विकासाची जात बघून मतदान करून,मला एक संधी द्यावी, असे आवाहन बीड लोकसभेच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांनी येथे बोलताना केले.
दरम्यान, कामामुळे लक्षात राहीले पाहिजे. मुंडे साहेबांवर गेवराई ने खूप प्रेम केलय. पालकमंत्री असताना उतराई होण्याचा प्रयत्न मी केलाय. आमदार लक्ष्मण पवार यांचा शब्द कधी पडू दिला नाही. असे सांगून, पंकजाताई मुंडे यांनी
शक्ती प्रमुखांचा क्लास घेऊन कार्यकर्त्यांना जबरदस्त “चार्ज” केले. थेट संवाद साधून पंकजा मुंडे यांनी बैठकीचा मूड चेंज केला तर, आमदार लक्ष्मण पवार यांनी अभ्यासपूर्ण भाषण करून, मतदारसंघाचा आढावा घेतला. स्व. मुंडे, पंकजाताई मुंडे यांनी भरभरून दिलय, हे प्रामाणिकपणे कबूल करून, आता आपला धर्म इमानदारीने पाळुन ताईंना दिल्लीत पाठवा, असे आवाहन आमदार पवार यांनी केले

भाजप महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारार्थ शहरात मतदारसंघातील सुपर वारियर्स, शक्तीकेद्र प्रमुख, बुथप्रमुखासह प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा आज आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी त्या बोलत होत्या. व्यासपीठावर आ.लक्ष्मण पवार, संघटनमंत्री संजय कौडगे, भाजप नेते मोहनराव जगताप, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, ॲड.सुरेश हात्ते, जे.डी. शहा, शिवसेना तालुका प्रमुख शिनुभाऊ बेदरे, सतीश पाटील, युवानेते शिवराज पवार, म.न.से. अध्यक्ष जयदीप गोल्हार, भाजपा अध्यक्षा रत्नमाला मोटे, भगवान घुबार्डे, नगराध्यक्ष सुशिल जवंजाळ, ब्रम्हदेव धुरंधरे, उपनगराध्यक्ष राजेंद्र राक्षसभुवनकर, राहुल खंडागळे,दादासाहेब गिरी, मधुकर वादे, याहयां खान, प्रा. कुंड यांची उपस्थिती होती.

पंकजाताई मुंडे या वेळी बोलताना म्हणाल्या की, भाजपाची खरी ताकद बुथ प्रमुख, वाॅरियर्स ,शक्ती प्रमुख आणि पक्षाचे कार्यकर्ते आहेत. तुम्ही, गावात जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्हिजन, त्यांची यशस्वी दहा वर्ष, केलेली लोकोपयोगी कामे सांगायची आहेत. विकास आणि विश्वास हेच आपले नाते आहे. जातीय तेढ निर्माण करणारांना थारा देऊ नका, आपण कधीही जातीच्या आधारावर मते मागीतली नाहीत. हा आपला, तो परका, असा भेद कधीही केला नाही.
लोकनेते मुंडे साहेबांनी, खासदार प्रितमताई आणि मी, आम्ही इमानदारीने काम केलय. पालकमंत्री म्हणून काम करत असताना आमदारांना भरपूर निधी दिला. आमदार लक्ष्मण आण्णांनी मागीतला तेवढे निधी दिला म्हणून गेवराई मतदारसंघात आज आण्णांच्या माध्यमातून झालेला विकास दिसतोय. एक संधी द्या, बीड चा खासदार म्हणून तुम्हाला अभिमान वाटेल असे काम करीन, असा विश्वास ही पंकजाताई मुंडे यांनी व्यक्त करून, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कुशल नेतृत्वाखाली बीड विकास करण्यासाठी मला निवडून द्या, असे आवाहन ही पंकजाताई यांनी शेवटी बोलताना केले.

गेवराईचा विकास पंकजाताईमुळे – आ. पवार

आमदार पवार म्हणाले,
मोदीजी, मुंडे साहेब आणि पंकजाताई यांनी जी कामे केली. त्या कामाचे मूल्यमापन करण्याची गरज निर्माण झाली असून, गेवराई मतदारसंघात जो विकास झालाय, तो ताईंच्या मदतीने झालाय. म्हणून, बीडचा खासदार ताई च्या रूपाने मोठ्या मताधिक्याने निवडून द्या, असे आवाहन आमदार पवार यांनी केले. भाजपाचा कणा हा कार्यकर्ता आहे. गेवराई मतदारसंघात नदीजोड प्रकल्प, सिंधफणेत पाणी आणायची ताकद खंबीर नेतृत्व म्हणून
पंकजाताई यांच्यात आहे. गेवराई मतदारसंघाला ताईनी पालकमंत्री म्हणून खूप मदत केली. आता परतफेड करायची वेळ आलीय, स्व. मुंडे साहेबांनी आणि ताईनी गेवराई मतदारसंघातील लोकांवर खूप प्रेम केलय, त्या उपकाराची परतफेड करून बीड जिल्ह्य़ात नवा इतिहास करा आणि सर्वाधिक मताधिक्य गेवराई मतदारसंघातून द्या, असे आवाहन ही शेवटी आमदार लक्ष्मण पवार यांनी केले. यावेळी मोहनराव जगताप, राजेंद्र मस्के, ॲड. सुरेश हात्ते यांची भाषणे झाले. ज्येष्ठ पत्रकार जेडी शहा यांनी पंकजाताई मुंडे बीड लोकसभेत, बीड ची लक्ष्मी म्हणून प्रवेश करतील, त्यांना आशीर्वाद द्या, असे आवाहन केले. संचलन पत्रकार सुशिल टकले यांनी केले. कार्यक्रमास भाजपाचे बुथप्रमुख, सुपरवारियर्स, शक्तीकेद्र प्रमुख, पदाधिकाऱ्यांसह नगरसेवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आभार उध्दव रासकर यांनी मानले.
••••

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!