गेवराई

गेवराईत कार- टँकरच्या भिषन अपघातात पाच ठार


गेवराई : सोलापूर औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावर गेवराई बायपासला कार आणि टँकरच्या झालेल्या अपघातात ५ जण ठार झाल्याची घटना घडली . सदर घटना गुरुवारी सकाळी घडली .
मिळालेल्या माहितीनुसार वंचित आघाडीचे लातूर जिल्हा अध्यक्ष हे आपल्या सहकाऱ्यांसोबत लातूरहून औंरगाबादकडे जात होते.  गेवराई शहरातील झमझम पेट्रोल पंपाच्या पाठीमागे त्यांच्या चालकाचा ताबा गाडीवरून सुटला आणि समोरून येणाऱ्या इंडीयन ऑईलच्या कंन्टेनरला जोराची धडक बसली. या अपघातात दोघे जागीच ठार झाले तर तिघांचा उपचारादरम्यान मृत्यु झाल्याची माहिती आहे. मयताची नावे अद्याप समजू शकली नाहीत. राष्ट्रीय महामार्गावरील अपघातांचे वाढते प्रमाण चिंता वाढविणारे आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!