बीड क्राईम गेवराई माजलगाव

तीन ठिकाणच्या अपघातात तीन दुचाकीस्वार ठार

माजलगाव ःअज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना राष्ट्रीय महामार्गावर शहापूर फाट्या जवळ शुक्रवार (दि.4) रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या दरम्यान घडली. बाळू पंडित कावळे (वय 32 रा.कर्ला ता.जि.जालना) असे मयत दुचाकीस्वाराचे नाव आहे. बाळू आपल्या दुचाकीवरुन (एमएच-21 4084) गावी जात होते. यावेळी त्यांच्या दुचाकीला राष्ट्रीय महामार्ग 222 वरील तालखेड माऊली फाट्याच्या जवळ अज्ञात वाहनाने जारोची धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले आहे. पुढील तपास पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

गेवराई ः तालुक्यातील सिरसदेवी फाटा येथे पिकअपच्या धडकेत
दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि.4) रात्रीच्या सुमारास घडली.
गणेश रुपबा भंडारी (वय 38 भेंडटाकळी ता.गेवराई) असे मयताचे नाव आहे. ते स्कुटीवरुन (एमएच-14 सीएस-8372) भेंडटाकळीकडे जात होते. यावेळी समोरुन आलेल्या बोलेरो पिकअपने (एमएच-44 यू-0980) जोराची धडक दिली. यामध्ये गंभिररित्या जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि.4) रात्री 9 च्या सुमारास सिरसदेवी फाट्याजवळ शिवनेरी हॉटेलसमोर घडली. घटनास्थळी महामार्ग पोलीस राधाकिसन नेवडे, किशोर सोनवणे, अनंत गिरी, अमर घुगे, गणेश चौघुले यांनी धाव घेत मृतेदह गेवराई उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला.

तेलगाव : तेलगाव, दिंद्रुड परिसरात गेल्या काही दिवसांपासुन दुचाकीला धडक बसुन अपघात होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असुन, ही अपघात मालिका सुरूच आहे. शुक्रवारी तेलगाव ते दिंद्रुड महामार्गावर बुधवारी सायंकाळच्या दरम्यान एका अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकी स्वार जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे, ही घटना संगमच्या पुलाजवळ घडली.
यासंदर्भात समजलेली माहिती अशी की, शुक्रवारी सायंकाळच्या दरम्यान एक दुचाकीस्वार मोटार सायकल (एमपी 41 एम. एल. 1868) ने परळीकडुन औरंगाबादकडे जात असताना दिंद्रुड जवळील हाकेच्या अंतरावर भरधाव वेगात पाठीमागुन येणार्‍या एका वाहनाने त्यास जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात सदर दुचाकीस्वाराच्या डोक्यास जबर मार लागुन जागीच ठार झाला. सचिन आनंद भोळे (रा.1016 पांढरी विठ्ठल मंदिर जवळ नांदेड) असे मयत इसमाचे नाव व पत्ता आहे. गेल्या काही दिवसांपासुन या परिसरात अपघातांचे प्रमाण वाढत असुन, दोन दिवसांपूर्वीच दिंद्रुडपासुन जवळच असलेल्या बेलोरा फाट्यावर दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने एक जण जागीच ठार झाला होता. एकमध्ये जाताच आज परत हा अपघात होऊन यातही एक जण जखमी झाल्याची घटना घडली. या वाढत्या अपघातांच्या घटनांमुळेचिंता व्यक्त केली जात आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!