बीड क्राईम गेवराई

सिरसाळ्याच्या वेशीवर ‘त्या’ अनाथ मातेचं वस्त्रहरण?

मारहाण करुन बलात्कार झाल्याची शक्यता ‘तो’नराधम कोण? सिसिटिव्हीत प्रकार कैद

सिरसाळा:- देशाच्या सर्वोच्च पदावर एका महिलेचा सन्मान होत असतांना दुसरी कडे ह्याच देशात एका अनाथ मातेच्या अब्रुची लक्तरे तोडली जातात पंरतू पोलीस प्रशासन व लोकप्रतिनिधींना याचे कसलेही गांभीर्य असल्याचे दिसत नाही. या विषयी सविस्तर वृत्त असे कि, परळी तालुक्यातील सिरसाळ्याच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात गेल्या 10/12 दिवसांपासून एक मतिमंद अनाथ महिला फिरत आहे. दि.23 रोजी च्या रात्री एका हॉटेल समोर बसली असतांना त्या ठिकाणी अज्ञात एक व्यक्ती आला व त्या महिलेच्या जवळ बसुन आजूबाजूला कुणी नसल्याचा अंदाज घेत तिला बळजबरी केली व फरपटत कुठे तरी ओढून घेऊन गेला. हा सर्व प्रकार सिसिटिव्ही मध्ये कैद झाला आहे.
सकाळी त्या महिलेची अवस्था विदारक दिसुन आल्याने येथील सिसिटिव्ही तपासले असता बाब उघड झाली. दरम्यान पोलीसांनी हे सिसिटिव्ही पाहिले पंरतु काही कार्यवाहीचे पाऊल उचलले नसल्याचे समजते आहे. बळजबरी करुन कुठे तरी फरफटत नेऊन त्या नराधमाने त्या अनाथ मतिमंद महिलेचे ’ वस्त्र ’ हरण /बलात्कार केल्याची शक्यता वर्तवली जात आहे.नेमका ’तो’नराधम कोण ? हे समजले नाही. पोलिसांनाही ह्या प्रकरणाचे गांभीर्य असल्याचे दिसत नाही. ह्या प्रकाराने सिरसाळ्यात खळबळ उडाली असुन लोकांमध्ये तिव्र रोष व्यक्त केला जात आहे.

क्या करती है पुलीस ?
ज्या ठिकाणी ह्या महिलेवर त्या नराधमाने अत्याचार केला त्या ठिकाणाहून हाकेच्या अंतरावर सिरसाळा पोलीस स्टेशन आहे. जर पोलीस स्टेशन च्या एवढ्या जवळ एका महिलेवर अत्याचार होत असेल आणि पोलिसांना याची भनक ही लागत नसेल तर ’क्या करती है पुलीस? असा सवाल उपस्थित होत आहे.

हॅलो मुख्यमंत्री शिंदे साहेब…
देशाच्या सर्वोच्च पदावर एक महिला विराजमान झाल्या नंतर आपण आनंद व्यक्त करत अभिनंदन केले,आपण महिलांचा खुप आदर करतात हे सर्वश्रूत आहे. पंरतु आपल्याच राज्यात परळी तालुक्यातील एका अनाथ मतिमंद महिलेवर पोलीस स्टेशन च्या अगदी जवळ अत्याचाराची घटना घडली आहे. एवढा गंभीर प्रकार होऊन देखील पोलीस प्रशासनाला गांभीर्य असल्याचे दिसत नाही, अजूनही ती अत्याचारीत महिला जखमी अवस्थेत गावच्या वेशीवर असणा-या चौकातच पडून आहे.तिला निवारा, सुरक्षा नसल्याने तिच्याशी असले गंभीर प्रकार होण्याची शक्यता नाकारत येत नाही. म्हणून आपण ह्या प्रकरणाची दखल घ्यावी अशी भावना लोकांमधून व्यक्त केल्या जात आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!