बीड

जीव टांगणीला: दवाखाना इमारतीचे प्लास्टर निखळले, छताळा गळती, जीव मुठीत घेत उपचार

चौसाळा प्राथमिक केंद्राची दुरवस्था

चौसाळा -प्राथमिक आरोग्य केंद्र चौसाळा याची दुरावस्था झाली असून, ओपीडी, आयपीडी खोल्यात गळती लागली आहे. इमारतीच्या छताचे प्लास्टर निखळत आहे. यामुळे रुग्णांना जीव मुठीत घेऊन उपचार करावे लागत आहे. डॉक्टरांना धास्ती बसली आहे.सध्या मागील पाच दिवसापासून सतत पाऊस चालु आहे.चौसाळा प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत पूर्ण गळत आहे.अश्यात डॉक्टरांनी उपचार कसा करायचा असा सवाल उपस्थित होत आहे.स्लॅबला गळती लागल्याने पावसात खोल्यांमध्ये पाणी साचते, अश्यात त्यामुळे उपचार करणे अशक्य होत आहे.
दवाखान्यात बसल्यावर डोक्यावर, खुर्चीवर, टेबलावर स्लॅबचे तुकडे पडत आहेत.धोका झाल्यास याला जबाबदार कोण…? असा सवाल उपस्थित होत आहे.त्यामुळेच पावसाळ्यात या इमारतीच्या स्लॅब मधून पावसाचे पाणी गळत आहे.दरम्यान स्लॅब मधून होणारी पाण्याची गळती थांबवण्यासाठी या स्लॅबवर टिनशेड उभारण्याचे मागणी ग्रामस्थांकडुन होत आहे.

चौकट
कामकाजावर झाला परिणाम

गळती अधिक प्रमाणात झाल्याने विद्युत प्रवाह खंडीत करण्यात आला.पाण्याची गळती होत असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्वत्र करंट उतरल्याने विद्युत प्रवाह खंडीत करण्यात आला. गळतीमुळे अन्य रुटीन कामेही रखडली आहे.आहे.बाह्यरुग्णाची संख्या 100च्या पुढे असल्याने व अंतरुग्णसंख्या रोज 25 पेशंट असल्याने तसेच प्रसुती,लसीकरण आणखी अत्यावश्यक सेवाचा भार वाढलेला आहे.व सध्या पावसाळा असल्याने साथ रोगाचा फैलाव होऊ शकतो.त्यात प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत पूर्णपणे गळत आहे.यावर जिल्हा आरोग्य विभागाने तात्काळ स्लॅब गळती थांबविण्यासाठी उपाय योजना करावी.अशी ग्रामस्थ व पंचक्रोशीतील जनतेची मागणी आहे. व तसेच दारूच्या नशेत येणारे पेशंट मुळे त्रास वाढला आहे. कर्मचारी यांना अरेतुरे करण्यात येत आहे.दवाखान्यात सुरक्षारक्षकाची नियुक्ती करावी अशी कर्मचार्‍यांनी मागणी केली आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!