बीड गेवराई

मारहाणीत एका तरुणाचा मृत्यू ! ; गेवराई तालुक्यातील तळण्याचीवाडी येथील घटना

गेवराई, दि.१६ (लोकाशा न्युज):- गेवराई तालुक्यातील उमापूर रोडवरील तळण्याचीवाडी येथे दोन गटात दि.१२ ऑगस्ट रोजी तुंबळ हाणामाऱ्या झाल्या होत्या या घटनेत नामदेव ढेंबरे (वय ३२) हा तरुण गंभीर जखमी झाला होता.त्यावर औरंगाबाद येथे उपचार सुरु होते.उपचारा दरम्यान मंगळवार रोजी दुपारी त्याचा मृत्यू झाला.मारहाण केलेल्या लोकांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी गावातील शोकडो तरुणांनी नामदेव यांचा मृतदेहासह रुग्णवाहिका गेवराई पोलीस ठाण्यात आणून संबंधित लोकांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यामुळे गेवराई पोलीस स्टेशन परिसरात काही काळ वातावरण तणावपूर्ण झाले होते. पोलीस उपनिरीक्षक जंवजाळ व बोडखे यांनी तरुणांची समजूत काढली. शिवाय या तरुणांनी वकिलाची राय घेत त्यांना गेवराई ठाण्यात पाचारण केले. गेवराई पोलिसांनी पुढील कारवाई सुरु केल्याची माहिती राञी उशिरा येत होती. दरम्यान या प्रकरणी गेवराई पोलीस सर्व बाबी तपासत असुन पुढील पाऊले उचलित आसल्याचे देखील समोर आले आहे. राञी उशिरापर्यंत याबाबत गेवराई पोलीस ठाणे परिसरात तरुण तळ ठोकून होते,तर पोलिस आपले नियमानुसार कर्तव्य बजावत आसल्याची माहिती समोर आली आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!