बीड गेवराई

वाळू माफियांची मुजोरी; कारवाईसाठी गेलेल्या पथकातील पोलिस कर्मचाऱ्याला ट्रँक्टरने उडवले

गेवराई तालुक्यातील खामगाव येथील घटना; ६ ट्रँक्टरसह लाखोंचा मुद्देमाल जप्त

गेवराई -तालुक्यातील खामगाव येथील गोदावरी नदीपात्रात अवैध वाळू उपसा होत असल्याची माहिती पोलिस अधीक्षक यांच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने आज सोमवारी सायंकाळी तेथील गोदावरी नदीपात्रात धाड टाकली. यावेळी वाळू माफियांनी पथकातील एका पोलिस कर्मचाऱ्याला ट्रँक्टरने उडवले. यामध्ये सदरील पोलिस कर्मचारी जखमी झाला असून उपचारासाठी गेवराई उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे सांगितले जाते. तर या कारवाईत एकुण ६ ट्रँक्टर या पथकाने ताब्यात घेत लाखोंचा मुद्देमाल जप्त केला आहे. गणेश धनवडे असे जखमी झालेल्या पोलिस नाईकचे नाव आहे. दरम्यान येथील पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, तालुक्यातील गोदावरी नदीपात्रात अवैध वाळू उपसा काही केल्याने थांबत नसल्याचे चित्र दिसत आहे. मागील काही दिवसांपासून सातत्याने कारवाया होत असताना देखील वाळू माफिया या कारवायांना भीक घालताना दिसत नाहीत. दरम्यान तालुक्यातील खामगाव येथील गोदावरी नदी पात्रात अवैध वाळू उपसा होत असल्याची माहिती पोलिस अधीक्षक यांच्या पथकाला मिळाल्यावरून आज सोमवार दि.४ सोमवार रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास तेथील नदीपात्रात पोलिस अधीक्षक यांच्या पथकाने धाड टाकली. यावेळी कारवाई करत तब्बल ६ ट्रॅक्टर पकडले असुन लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर हि कारवाई करताना पथकातील पोलीस नाईक गणेश धनवडे हे ट्रॅक्टरला पकडण्यासाठी गेले असता त्यांना एका ट्रॅक्टर चालकाने जोरात धक्का दिला असून ते जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय गेवराई येथे दाखल केले असून या प्रकरणी उशिरा पर्यंत गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. ही कारवाई पोलिस अधीक्षक पथकातील पोलिस निरीक्षक गणेश धोक्रट, गणेश धनवडे, गोविंद काळे, गेवराई येथील ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक प्रफुल्ल साबळे, पोलीस उपनिरीक्षक तुकाराम बोडके सह पोलीस कर्मचारी यांनी केली.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!