बीड माजलगाव

माजलगांव सेवा सहकारी सोसायटी निवडणुक गुपचुप गुपचुप ; गुप्तता ठेवुन बिनविरोध निवडणुक काढण्याचा डाव

माजलगांव:- माजलगांव सेवा सहकारी सोसायटी ही तालुक्यातील एक प्रतिष्ठेची आणि सर्वात मोठी सोसायटी आहे. गेल्या निवडणुकीत एकीकडे आ. प्रकाश सोळंके यांचा गट तर दुसरीकडे येथीलच दिग्गज मंडळींनी एकत्र केलेला गट अशी अटीतटीची लढत झाली होती त्यात आ. सोळंके यांच्या गटाला मात खावी लागली होती परंतु या निवडणुकीत परिस्थिती वेगळी असुन त्यावेळी समोरा समोर असलेले अनेक राजकारणी आता एका गादीवर असल्याने निवडणुक गुपचुप गुपचुप गुंडाळत सोसायटी राजकिय सेटलमेंटमध्ये कुणाला तरी आंदण देण्यासाठीच्या हालचाली सुरु असुन गुप्तपणे निवडणुक पार पाडण्याचे राजकिय मनसुबे सोसायटीतील सभासदांनी आता उधळले आहेत.
माजलगांव सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहिर झाला असुन अर्जभरण्याची प्रक्रिया देखील सुरु आहे. दिनांक 8 एप्रिल ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख असुन अर्ज भरण्यासाठीचे तीन दिवस उरकुन देखील गेलेले आहेत परंतु ब-याच सभासदांना सोसायटीची निवडणुक लागल्याचीच माहिती अजुनही झालेली नाही. अर्ज भरण्यासाठी आता केवळ दोनच दिवसांचा कालावधी उरलेला आहे. या दोन दिवसांच्या कालावधीत कमीत कमी अर्ज येवून निवडणुक बिनविरोध काढण्यासाठीच्या मोठया हालचाली सुरु होत्या परंतु कांही सुज्ञ सभासदांनी माध्यमांना माहिती कळविल्यानंतर निवडणुक लागली असल्याचे माध्यमांना देखील माहित झाले. वास्तविक पाहता ज्या वर्तमानपत्रात निवडणुक कार्यक्रमाची जाहिरात देण्यात आली होती त्या वर्तमानपत्राचे त्या दिवसाचे सर्वच अंक एकदाच विकत घेवून जनसामान्यांना या निवडणुकीची माहिती होवू नये अशीच तजविज करण्यात आली होती तसेच सर्वसामान्य सभासदांना निवडणुकीपासुन वंचित ठेवण्याचाही डाव खेळला गेला असल्याचे सभासदांकडुन समजले त्यामुळे निवडणुक गुपचुप गुपचुप गुंडाळण्यामागे कोण आहेत व त्यांचा हेतु आहे हे लवकरच स्पष्ट होईल. दरम्यान माजलगांव सेवा सहकारी सोसायटीसाठी 8 मे रोजी मतदान होणार असुन तब्बल एक महिन्याचा दीर्घ कालावधी असला तरी उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख मात्र दोनच दिवसात संपत आहे. दि. 11 एप्रिल रोजी अर्जांची छाणनी होणार असुन 8 मे 2022 रोजी मतदान व त्यानंतर लगेचच मतमोजणी होणार असल्याची माहिती सहाययक निबंधक व्ही.एस. जगदाळे तसेच निवडणुक निर्णय अधिकारी एस.डी. नेहरकर यांनी दिली आहे. दि. 5 एप्रिल 2022 पर्यंत अभय होके पाटील, मोहन चोरमले, योगीता गोपाळ, दत्ता वसंतराव रांजवण आदींचे अर्ज प्राप्त झाले आहेत.

भारतीय जनता पार्टी झोपीतच तर राष्ट्रवादीचा सेटलमेंट मोड
राजकिय गोटात निवडणुक म्हटलं की प्रतिस्पर्धी गट हा लक्ष ठेवूनच असतो व शह काटशह असे प्रकार चालतात मात्र येथील भाजप स्थानिक स्वराज्य संस्था व सोसायटयांच्या निवडणुका या कार्यकत्र्यांच्या निवडणुका म्हणुन गचपडीच्या गोळया खावुन झोपली की काय असा संशय येवू लागला असुन भाजपाला कार्यकत्र्यांच्या निवडणुका वा-यावर सोडुन काय फक्त आमदारकीच पाहिजे काय असा प्रश्न उपस्थित होवू लागला आहे तर राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टीकडुन अजुन एकाही उमेदवाराची उमेदवारी न आल्यामुळे राष्ट्रवादीचा येथे सेटलमेंट मोड आहे की काय अशी शंका येवु लागली आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!