बीड गेवराई

अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार ; मृत बिबट्यास पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी; गेवराई तालुक्यातील वडगाव ढोक फाटा येथील घटना

गेवराई, दि.16 :- बीड औरंगाबाद या राष्ट्रीय महामार्गावर गेवराई शहरापासून जवळच असलेल्या वडगाव ढोक शिवारातून रस्ता ओलाडत असतांना आज्ञात वाहनाने धडक दिल्याने या अपघातात बिबट्या जागीच ठार असून या घटनेत बिबट्याचा दुर्दैवी अंत झाला ही घटना शनिवारी रात्री आठच्या सुमारास घडली आहे .
या बाबत सविस्तर माहिती अशी की , गेवराई शहरापासून काही अंतरावर असलेल्या बीड औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावर गेवराई बायपास वरील
वडगाव फाटा नजिक जयेश पंपासमोर रस्ता ओलाडत असतांंना आज्ञा वाहनाने धडक दिल्याने बिबट्या अपघातात जागीच ठार आहे. या अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी बिबट्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. घटनास्थळी गेवराई पोलीस यांनी भेट देवून घटनेची पाहणी केली. दरम्यान पुढील कारवाई वनविभागाचे अधिकारी यांच्या कडे आहे. या घटनेमुळे मात्र परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!