गेवराई

भरधाव टेम्पोची दुचाकीला धडक ; दोन जण जागीच ठार

बागपिंपळगाव कँम्पवर येथील घटना

गेवराई : लोकाशा न्युज
विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव टेम्पोने दुचाकीला जोराची धडक दिली. यामध्ये दोन जण जागीच ठार झाल्याची घटना गेवराई जवळील बागपिंपळगाव कँम्पवर सोमवारी रात्री सात वाजण्याच्या सुमारास घडली. बाबासाहेब सौंदलकर (वय ५०) व गोरख लिंबाजी शेंडगे (वय ४५) दोघे रा.विठ्ठलनगर (रेवकी) ता.गेवराई जि.बीड असे मयतांची नावे आहेत.
याबाबत माहिती अशी की, बाबासाहेब सौंदलकर व गोरख लिंबाजी शेंडगे हे आपल्या दुचाकीवरून विठ्ठलनगर (रेवकी) याठिकाणी जात होते. दरम्यान औरंगाबाद हून गेवराईकडे महामार्गाच्या विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव टेम्पोने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. यामध्ये दुचाकीचा चक्काचूर झालाच, शिवाय दुचाकीवरील दोघेही जागीच ठार झाले. हि घटना धुळे-सोलापूर महामार्गावरील बागपिंपळगाव कँम्प याठिकाणी घडली. घटनेनंतर महामार्गावरील वाहतूक कोंडी झाली होती. घटनेची माहिती मिळताच महामार्ग तसेच गेवराई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही मयतांना येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले. यावेळी उपजिल्हा रुग्णालयात नातेवाईकांसह नागरिकांची मोठी गर्दी जमली होती.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!