गेवराई

भाजपाच्या बुथ रचनेमुळेच आ.लक्ष्मण अण्णा पवारांना दोन वेळा विधानसभेची संधी मिळाली- राजेंद्र मस्के

गेवराई(प्रतिनिधी)

    भारतीय जनता पार्टीच्या वतीने राज्यात बुथ रचना अभियान सुरू झाले आहे. आज गेवराई येथे  कार्यसम्राट आ.लक्ष्मण अण्णा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या अध्यक्षतेखाली गेवराई विधानसभा मतदार संघाची बुथरचना बैठक संपन्न झाली. या बैठकीत जिल्हा संघटन चिटणीस प्रा. नागरगोजे सर, जिल्हा अभियान संयोजक शंकर देशमुख, गेवराई तालुकाध्यक्ष प्रकाश काका सुरवसे यांचेसह गेवराई विधानसभा मतदारसंघातील बुथ प्रमुख,पदाधिकारी,कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थितीत होते.

    या बैठकीस मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के म्हणाले कि आज देशभरात भारतीय जनता पार्टीला जे घवघवीत यश प्राप्त झाले आहे. यामध्ये बूथ रचना प्रक्रियेची भूमिका महत्वाची ठरली. बूथ रचनेमुळे नियोजित लक्ष्य गाठण्यासाठी फार मोठी मदत मिळते. पक्ष यंत्रणा शेवटच्या घटकांपर्यंत राबवता येते व कोणत्याही निवडणुकीत बिनदिक्कतपणे यश मिळवता येते. बीड जिल्ह्यातील गेवराई विधानसभा मतदार संघातील बुथारचना अत्यंत व्यवस्थित झालेली दिसून येते. या मतदार संघातील 395 बूथमध्ये बूथप्रमुख, शक्तीकेंद्र प्रमुख व सक्षम कार्यकर्ते उभा करण्याचे काम आ.लक्ष्मण अण्णा पवार यांनी केले आहे. यामुळेच गेवराई विधानसभा मतदार संघात विक्रमी मतांनी अण्णा निवडून आले आहेत. आ.लक्ष्मण अण्णा यांच्या कार्याचा उल्लेख राज्यभर होत आहे. अतिशय प्रामाणिक आणि पारदर्शकपणा त्यांच्या कार्यातून दिसून येतो. मागील काळामध्ये तत्कालीन राज्यकर्त्यांनी गेवराई मतदार संघाची बकाल अवस्था करून ठेवली होती. राज्यात भारतीय जनता पार्टीची सत्ता आल्यानंतर लोकनेत्या पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांच्या माध्यमातून ग्रामविकास खात्यामार्फत करोडो रुपयांचा निधी रस्ते बांधकामासाठी देण्यात आला. यामुळे गेवराई मतदार संघाचा खर्‍या अर्थाने विकासाचा अनुशेष भरून निघाला. आलेल्या निधीचा विनियोग अण्णांनी काटेकोरपणे करून घेतला. यामुळे आज सगळीकडे चांगले रस्ते झालेले आहेत. मतदार संघातील सर्व रस्ते चांगले करण्याची मोहीम अण्णांनी हाती घेतली आहे. रस्ता असो वा कोणतेही विकास काम गुणवत्तेत तडजोड न करणारा आमदार म्हणून ते पुढे आले.यामुळे मतदार संघातील जनतेचा त्यांच्या कार्यावर विश्वास आणि कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला. जनतेच्या पसंतीला उतरणारा आमदार म्हणून आ.लक्ष्मण अण्णा यांची समाजामध्ये ओळख निर्माण झाली. कार्यकर्त्यांनीही त्यांच्या कार्याला खंबीर साथ देण्याचे काम केले पाहिजे. आपल्या गावाचा,परिसराचा विकास कार्यसम्राट आमदारांच्या सहकार्यातून करून घ्यावा असे आवाहन यावेळी केले.  

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!