गेवराई

पांढरवाडी भाजपाचे उपसरपंच महंमद यासीन भाई राष्ट्रवादीत दाखल,माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी केले स्वागत

गेवराई दि. १५ (प्रतिनिधी) गेवराई भाजपा मध्ये अल्पसंख्याक कार्यकर्त्यांची मोठी घुसमट होत आहे, या पार्श्वभूमीवर मौजे पांढरवाडी येथील भाजपा उपसरपंच महंमद यासिन भाई यांनी सहकाऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित यांच्या उपस्थित मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी त्यांनी भाजपा कडून अल्पसंख्याक समाजावर होत असलेल्या अन्यायाचा पाढा वाचला. महंमद यासिन यांच्या पक्ष प्रवेशामुळे गेवराई भाजप मधील अल्पसंख्यांक कार्यकर्त्यांवर सतत होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडली आहे.

मंगळवार दि. १५ डिसेंबर रोजी मौजे पांढरवाडी ता. गेवराई येथील भाजपाचे उपसरपंच महमंद यासीन महमंद अखिल तसेच भाजपाचे कट्टर समर्थक बप्पासाहेब खिसाडे यांनी सहकाऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला. अमरसिंह पंडित यांनी त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये स्वागत करून शुभेच्छा दिल्या. मौजे पांढरवाडी हे गाव भाजप आमदार लक्ष्मण पवार यांनी दत्तक घेतले होते, मात्र गेवराई शहराच्या जवळ असतांनाही या गावात विकास कामे झाली नाहीत, त्यामुळे ग्रामस्थांमध्ये फसवणूक झाल्याची भावना आहे. परिणामी अनेक लोक भाजपा सोडण्याच्या मार्गावर असल्याचे उपस्थित ग्रामस्थांनी सांगितले.

 यावेळी अशोक टकले, राजेंद्र टकले, जगदीश मराठे, हरी मुळे, वैजनाथ टकले, सुरेश जाधव यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!