बीड

माझा प्रचार सर्व सामान्य जनतेनीच हातात घेतला ; जिल्हयाला विकासाच्या उंचीवर नेण्यासाठी साथ द्या – पंकजाताई मुंडे, पंकजाताई मुंडे यांची आष्टीत अभूतपूर्व सभा ; प्रचार सभेला तोबा गर्दी, बुध्दीभेद करून अफवा पसरविणारांना थारा देऊ नका -आ. सुरेश धस

आष्टी | दिनांक १८।
प्रचारासाठी गावोगावी जाताना लोक भेटतात. पूर्वी मी केलेल्या कामांची यादी वाचतात, ‘ताई तुमच्यामुळेच खूप मोठा निधी आला, कामे मार्गी लागली’,असे सांगतात. पालकमंत्री असताना केलेल्या विकास कामाचे समाधान वाटते. सर्वसामान्य जनतेनेच माझा लोकसभेचा प्रचार हाती घेतला आहे याची प्रचिती येत आहे. मागच्या निवडणुकीत या मतदारसंघाने सत्तर हजारांची मताधिक्य दिले आहे हा विश्वास यापुढेही कायम राहणार आहे. जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी तुमचा हक्काचा माणूस म्हणून मी दिल्लीत काम करेल.’घडी गेली की पिढी जाते’ त्यामुळे या निवडणुकीत चूक न करता जिल्ह्याच्या सर्वकष विकासासाठी प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन भाजप-महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांनी आज येथे केले. दरम्यान स्वतःचा पराभव दिसत असल्याने भाजपवर बिनबुडाचे आरोप करून संभ्रम निर्माण करणाऱ्यांना जनता थारा देणार नाहीत, पंकजाताई मुंडे यांना प्रचंड मतांनी निवडून येतील असा विश्वास आ. सुरेश धस यांनी व्यक्त केला.

आष्टी शहरात त्यांची जाहीर सभा संपन्न झाली, यावेळी त्या बोलत होत्या. व्यासपीठावर आमदार सुरेश धस, भाजपचे तालुकाध्यक्ष साहेबराव मस्के, शिवसेनेचे जालिंदर नागरे, नगराध्यक्ष जिया बेग, अरुण निकाळजे, सविता गोल्हार आदी उपस्थित होते.

भाषणाच्या सुरुवातीला पंकजाताई मुंडे यांनी बीड त्यांनी जिल्ह्याच्या विकासाचा आराखडा मतदारांसमोर मांडतानाच माझी उमेदवारी जनतेने मान्य केली आहे, त्यामुळे विजय निश्चित असल्याचे सांगत आपण सर्वांनी आपले मत देऊन जिल्ह्याच्या विकासासाठी मला पाच वर्षे संधी द्यावी असे आवाहन केले. त्या पुढे
म्हणाल्या, मंत्री पदाचा उपयोग मी जिल्ह्यात विविध योजना आणण्यासाठी केला. जलयुक्त शिवार असो की अस्मिता योजना, ऑनलाइन शिक्षक बदली प्रक्रिया, ग्रामपंचायत इमारतीसाठी दिलेला निधी असो. वेळोवेळी निधी मंजूर करून आणत विकासाचे प्रश्न मार्गी लावले आहेत. गत बावीस वर्षापासून मी राजकारणात सक्रिय आहे. आताची ही निवडणूक संसदेची आहे, त्यामुळे मतदान देताना जनतेने आपल्या हक्काचा लोकप्रतिनिधी समजून मला संधी द्यावी. तुमचे मतदान वाया जाऊ देणार नाही.

जनतेनीच माझा प्रचार हातात घेतला

विकास कामात आम्ही कधीही भेदभाव केला नाही, तो संस्कार आमचा नाही. अनेक वर्ष राजकारण करताना आम्ही सर्वांना सोबत गजरून पुढे जात आहोत. मी मंत्री असताना केलेली कामे जनता मला सांगते. सभेला होणारी गर्दी हे माझ्या कामाचे उत्तर आहे, मात्र काही जणांकडून अपप्रचार केला जातोय; परंतु पंकजा मुंडेंची निवडणूक जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेने हाती घेतली आहे हे विरोधकांनी लक्षात घ्यावे. गत निवडणुकीत पाच लाख मते घेणारे नंतर कधी जनतेसमोर आले का? असा सवालही त्यांनी केला.

ही निवडणूक जिल्ह्याचे भविष्य ठरवणारी आहे. देशाच्या पंतप्रधानपदी तिसऱ्यांदा नरेंद्र मोदीजी हेच विराजमान होणार आहेत. असे सांगत त्या म्हणाल्या, पंकजा मुंडे म्हणून मला वैयक्तिक काही नकोय. जनतेबद्दल माझ्यात तळमळ आहे आणि याच तळमळीतून मी समाजकारण आणि राजकारण करते आहे. भाजपने मला त्यामुळेच दिलेली बीड लोकसभेची उमेदवारी तुम्ही सर्वांनी सार्थ ठरवावी, एवढीच माझी अपेक्षा असल्याचेही त्या म्हणाल्या.

जिल्हयाला विकासाच्या उंचीवर नेणार

तुमच्या प्रत्येक मताचा उपयोग मी बीड जिल्हा विकसित करून दाखवण्यासाठी करेल. म्हणून या निवडणुकीत विकास हेच व्हिजन पुढे नेण्यासाठी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा. भविष्यात जिल्ह्यासाठी खूप काही करायचे आहे असा विश्वासही पंकजाताईंनी उपस्थितांना दिला.

बुध्दीभेद करणाऱ्यांना थारा देऊ नका – आ.सुरेश धस

सभेत आमदार सुरेश धस यांनी विरोधकांचा खास शब्दात समाचार घेतला. ते म्हणाले,अब की बार चारसो पारचा नारा भाजपाने दिल्यानंतर आपले विरोधक भाजप संविधान बदलणार असल्याचा अपप्रचार करून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम करू लागले आहेत मात्र बीड जिल्ह्यातील जनता अशा लोकांना चांगले ओळखते. ही जनता विरोधकांना थारा देणार नाही. भाजप हा समाजातील शेवटच्या वंचित घटकाला न्याय देण्याचे काम करत असलेला पक्ष आहे. काँग्रेसने पाच सो पारचा नारा द्यावा आमचे काहीच म्हणणे नाही पण आम्ही चारसो पारचा नारा दिल्यानंतर त्यांना पोटशुळ का उठत आहे, असा खडा सवाल ही आमदार सुरेश धस यांनी केला.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!