बीड

बीड लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या दिवशी 39 जणांनी घेतले 92 नामनिर्देशन पत्र

बीड, दि. 18: – आजपासून 39 बीड लोकसभा मतदारसंघात नामनिर्देशन पत्राचे वाटप सुरू झाले तथापि अर्ज दाखल करण्याच्या आजच्या पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल झालेला नाही.
पहिल्या दिवशी 39 व्यक्तींनी 92 नामनिर्देशन पत्र घेतले.
आज निवडणुकीची अधिसूचना जारी झाली आहे. आजपासून त 25 एप्रिल पर्यंत, सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील जिल्हा नियोजन कार्यालयात नामनिर्देशन पत्र वाटप सुरू असणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी दीपा मुधोळ मुंडे या निवडणुकीत उभे राहणाऱ्या उमेदवारांकडून भरलेले नामनिर्देशन पत्र सर्व कागदपत्रांसह स्वीकारतील. आज कोणत्याही उमेदवाराने नामनिर्देशन पत्र दाखल केले नाहीत.

नामनिर्देशन पत्रासोबत शपथपत्र( नमुना 26 ) हा 25 एप्रिल रोजी दुपारी 3.00 वाजेपर्यंत सादर करावे लागणार आहेत.शपथपत्र अपूर्ण असल्यास दुसरे शपथ पत्र सादर करण्याची दिनांक 26 एप्रिल सकाळी 11.00 वाजेपर्यंत आहे. याच दिवशी मतदार यादीची प्रमाणित प्रत देखील दाखल करावी लागणार आहे. फॉर्म ए व फॉर्म बी 25 एप्रिल दुपारी 3.00 वाजेपर्यंत सादर करणे आहे.

39 बीड लोकसभा मतदारसंघात सोमवार दिनांक 13 मे रोजी मतदान होणार आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!