बीड

पंकजाताई मुंडे यांना अभूतपूर्व मताधिक्य देण्याचा भाजप अल्पसंख्यांक मोर्चा आणि कामगार आघाडीचा निर्धार, प्रत्येक बूथद्वारे पूर्वीपेक्षा अधिक मताधिक्य द्या, खा.प्रितमताईंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना

बीड | दि. १८ | महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्या विजयासाठी आता भाजपचा अल्पसंख्यांक मोर्चा आणि कामगार आघाडी सरसावली आहे. पंकजाताईंना अभूतपूर्व मताधिक्य देण्याचा निर्धार जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या झालेल्या बैठकीत करण्यात आला. या दोन्ही बैठकीस खा. प्रितमताई मुंडे यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. मागील दहा वर्षाच्या काळात पंकजाताई मुंडे यांनी केलेल्या विकास कामांमुळे त्यांचा विजय निश्चित आहे, डोअर टू डोअर प्रचार यंत्रणा राबवून केंद्र सरकारच्या योजना आणि पंकजाताई मुंडे यांनी केलेली विकासकामे मतदारांपर्यंत पोहोचवा आणि पूर्वीपेक्षा अधिक मते मिळवून देण्यासाठी परिश्रम घ्या’ अशा सूचना खा. प्रितमताई मुंडे यांनी पदाधिकाऱ्यांना केल्या. 

बीड भाजपच्या कामगार आघाडी व अल्पसंख्यांक मोर्चाची लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काल ( गुरुवार ) बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत खा. प्रितमताई मुंडे यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की ‘ग्रामविकास मंत्री असताना पंकजाताई मुंडे यांनी बीड जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात विकास निधी मिळवून दिला. या माध्यमातून त्यांनी आपल्या जिल्ह्यात सर्वसामावेशक विकासाचे बिजारोपन  केले आहे. तसेच कष्टकरी कामगार, ऊसतोड मजुरांना न्याय देण्याचे काम ही पंकजाताई मुंडे यांच्या माध्यमातून झाले असून नुकतीच ऊसतोड मजुरांना इतिहासात मिळाली नाही ऐवढी दरवाढ पंकजाताई मुंडे यांनी मिळवून दिली असल्याचे खा.प्रितमताई म्हणाल्या.

आपला जिल्हा कष्टकरी, ऊसतोड मजुरांचा जिल्हा आहे. कामगार आघाडीने कष्टकरी, कामगारांचे मित्र होऊन त्यांच्या अडचणी आमच्यापर्यंत आणाव्यात. केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजना गरजू लोकांपर्यंत पोहोचवून पंकजाताई मुंडे यांच्या पाठीशी त्यांचे आशीर्वाद उभे करावेत. येणारा काळ देखील आपलाच आहे, या काळात कामगार आघाडीच्या माध्यमातून कामगार मित्र आणि विविध योजनांची सांगड घालून कामगार, कष्टकऱ्यांसाठी मोठे काम आपल्याला उभारायचे आहे, आपल्या या संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आपल्या नेत्या आणि महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांना मताधिक्य मिळवून दया’ असं आवाहन खा. प्रितमताई मुंडे यांनी उपस्थितांना केल. 

*आवाम में जाएंगे, पंकजाताई को वोट दिलायेंगे ; अल्पसंख्यांक आघाडीने केला विजयाचा संकल्प* 

भाजप अल्पसंख्यांक आघाडीने लोकसभा निवडणुकीत संपूर्ण ताकदीने पंकजाताईंच्या विजयात योगदान देण्याचा संकल्प या बैठकीदरम्यान केला. मुस्लिम समाज बांधवांमध्ये लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब, पंकजाताई आणि प्रितमताई यांच्या विषयी वेगळा जिव्हाळा आहे, त्यांचे कार्य सर्वसमावेशक आहे’ अशा भावना अनेकांनी यावेळी व्यक्त केल्या. तर खा. प्रितमताई मुंडे यांनी यावेळी पदाधिकाऱ्यांना विविध सूचना केल्या. जिल्ह्यातील प्रत्येक मतदाराला पंकजाताई मुंडे यांनी केलेल्या सर्वसमावेशक विकासाची माहिती दया, पासपोर्ट कार्यालय, प्रधानमंत्री घरकुल योजना, मोफत अन्नधान्य, पाच लाखांपर्यंत मोफत उपचार’ या केंद्र सरकारच्या योजनांची उपयुक्तता सांगून विरोधकांचा अपप्रचार खोडून काढा. आपल्या बूथद्वारे गतवेळेपेक्षा अधिक मतदान पंकजाताईंना मिळवून दया अशा सूचना त्यांनी दिल्या.

*खा. प्रितमताईंकडून नुकसानीची पाहणी ; बीड शहरात मतदारांच्या घेतल्या भेटी*

बीड तालुक्यातील नाळवंडी इथे अवकाळी पाऊस आणि वाऱ्यामुळे अतोनात नुकसान झाले आहे, खा. प्रितमताई मुंडे यांनी झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करून नुकसानग्रस्तांना लवकरात लवकर मदत उपलब्ध करून देण्याची मागणी प्रशासनाकडे केली. तद्नंतर त्यांनी बीड शहरातील मतदारांना भेटून त्यांच्याशी चर्चा केली. पंकजाताई मुंडे या जिल्ह्यासाठी विकासाचे व्हिजन असलेल्या सुसंस्कृत, सर्वसमावेशक आणि विकासाभिमुख नेत्या आहेत. आपल्या जिल्ह्याच्या सर्वांगीन विकासाला पूर्ववत गती देण्यासाठी पुन्हा एकदा त्यांच्या पाठीशी मतदानरुपी आशीर्वाद उभे करा’ असे आवाहन त्यांनी यादरम्यान मतदारांना केले.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!