बीड

गेवराई तालुक्याच्या विकासात कधीही खंड पडू देणार नाही -अमरसिंह पंडित,राजश्री शाहू महाराज नगर येथे रस्त्याच्या कामाचा शुभारंभ

गेवराई तालुक्याच्या विकासात कधीही खंड पडू देणार नाही -अमरसिंह पंडित

राजश्री शाहू महाराज नगर येथे रस्त्याच्या कामाचा शुभारंभ

गेवराई दि.१८ (प्रतिनिधी) गेवराई तालुक्याच्या सर्व क्षेत्राचा विकास करताना आपण कधीही भेदभाव आणि राजकारण केले नाही. तालुक्यातील सर्व घटकांच्या विकासासाठी खुप मोठ्या विकास योजना खेचून आणल्या. विकासाच्या बाबतीत कुणी राजकारण करत असेल तर मी ते खपवून घेणार नाही. गेवराई शहरवासियांसह ग्रामिण भागाला आपण कधीच वा-यावर सोडणार नाही. संकटकाळी आतापर्यंत सर्वांना धिर दिला आणि यापुढेही त्यांना मुलभूत सुविधा देण्यासाठी सदैव तयार असल्याचे प्रतिपादन माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी केले. गेवराई शहरातील छत्रपती राजश्री शाहू महाराज नगर येथील २० लक्ष रुपये किंमतीच्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करताना ते बोलत होते.

गेवराई शहरातील छत्रपती राजश्री शाहू महाराज नगर येथील २० लक्ष रुपये किंमतीच्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ गुरुवार दिनांक १७ जून रोजी गेवराई शहरातील छत्रपती राजश्री शाहू महाराज नगर येथील २० लक्ष रुपये किंमतीच्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी रिपाईचे तालुकाध्यक्ष किशोर कांडेकर, शिक्षक पतसंस्थेचे माजी चेअरमन विष्णू खेत्रे, नगरसेवक श्यामकाका येवले,
प्रा. राजेंद्र बरकसे, भारत सौंदरमल आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना अमरसिंह पंडित यांनी म्हणाले की, कोरोनाच्या गंभीर परिस्थितीत आपण निरपेक्ष भावनेने शारदा कोविड केअर सेंटर उभारले, वैयक्तिक लक्ष घालून सर्व सुविधा उपलब्ध करुन दिल्या, आपण जनतेला सदैव मदत करण्याची भुमिका ठेवली. गोदावरीचा पुर, मधल्या काळात आलेला दुष्काळ आणि आता कोरोनाचे संकट यावेळी मी सेवाभाव ठेऊन काम केले. गेवराई शहरासह तालुक्यातील ग्रामिण भागाच्या विकासासाठी आपण कधीही राजकारण आणि तडजोड केली नाही आणि यापुढे करणार.नाही असहीे ते म्हणाले.

यावेळी रिपाईचे तालुकाध्यक्ष किशोर कांडेकर यांनीही मनोगत व्यक्त केले. कोरोना नियमाचे पालन करत आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला दत्ता जाधव, शिंदे सर, ढेरे सर, सगळे सर, सुनील सुतार, गणेश मोटे, गोडबोले सर, सुंदर सोनवणे, राहुल भोसले यांच्यासह माऊली नगर व परिसरातील नागरिक मोट्या संख्येने उपस्थित होते. या सुरु होत असलेल्या रस्त्याच्या कामामुळे येथील नागरिकांनी समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दयानंद कांडेकर आणि आभार दहिफळे सर यांनी मानले.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!