बीड

कंत्राटी कर्मचार्‍यांना शासकीय सेवेत प्राधान्य मिळणार; आ.क्षीरसागरांच्या मागणीवर उपमुख्यमंत्र्यांची सकारात्मक भूमिका

बीड (प्रतिनिधी):- बीड जिल्हा रूग्णालयामध्ये कोव्हिड काळात कंत्राटी तत्त्वावर काम करणार्‍या आरोग्य सेवक, सेविका, वॉर्ड बॉव व अन्य कंत्राटी कर्मचार्‍यांना कायमस्वरूपी शासन सेवेत घेण्यात यावे, शासन सेवेत घेतांना प्राधान्य द्या या संघटनेच्या मागण्या आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे, पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या कानी आढावा बैठकीत टाकल्या. यावर अजित दादा पवार यांनी या सर्व कंत्राटी कर्मचार्‍यांना शासन सेवेत घेतांना प्राधान्य देण्यात येणार असल्याची सकारात्मक भूमिका घेतली. बैठक संपल्यानंतर आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी अजित दादा पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे, पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या सूचनेवरून कंत्राटी कर्मचारी संघटनेतील पदाधिकार्‍यांशी महाविकास आघाडी सरकार आपल्या मागण्यांशी सकारात्मक असून आपल्या पाठिशी असल्याचे सांगितले आहे. शुक्रवार दि.18 जुन रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजितदादा पवार बीड जिल्ह्याच्या दौर्‍यावर आले होते. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात कोव्हिड 19 परिस्थितीचा व खरीप हंगामाचा आढावा घेतला. यावेळी आरोग्य मंत्री राजेश टोपे, पालकमंत्री तथा सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर, जिल्हाधिकारी राजेंद्र जगताप, आ.प्रकाश सोळंके, जि.प.अध्यक्षा शिवकन्या सिरसाट, आ.बाळासाहेब आजबे, आ.सतिष चव्हाण, आ.सुरेश धस, आ.संजय दौंड, आ.विक्रम काळे, माजी आ.सय्यद सलीम, माजी आ.सुनिल धांडे, पोलीस अधिक्षक आर.राजा यांच्यासह सर्व विभागातील अधिकार्‍यांच, कर्मचार्‍यांची उपस्थिती होती. यावेळी  बोलतांना आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी बीड मतदार संघातील अनेक विषय अजित दादांसमोर मांडले. शेतकर्‍यांना शुन्य टक्के व्याजदराने बिनव्याजी 3 लाखापर्यंत कर्ज देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल तसेच बीड जिल्हा रूग्णालय येथे 200 खाटाचे नवीन रूग्णालय मंजूर केल्याबद्दल आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी अजित दादांचे अभिनंदनपर ठराव मांडला. कोव्हिडमध्ये काम करणार्‍या कंत्राटी कर्मचार्‍यांना शासकीय सेवेत सामावून घ्या ही मागणी करत बीड मतदार संघातील शेतकर्‍यांच्या मागणीनुसार डीएपी युरिया खत वाढीव देण्यात यावे. शेतकर्‍यांना नवीन पीक कर्ज देण्याबाबत जिल्हा बँक व राष्ट्रीयकृत बँकांनाही तात्काळ आदेश निर्गमीत करण्यात यावे अशी विनंतीही त्यांनी या बैठकीत केली. कोव्हिड लस बाबत अधिक डोस बीड मतदार संघाला मिळावेत अशी विनंती करत त्यांनी बीड मतदार संघातील अनेक प्रश्न या बैठकीत मांडले. यावर अजित दादा पवार यांनी कोव्हिड काळात काम करणार्‍या कंत्राटी कर्मचार्‍यांना शासकीय सेवेत घेतांना सरकार प्राधान्य देणार असल्याची सकारात्मक भूमिका घेतली. यावेळी उपस्थित सभागृहातील सर्वच लोकप्रतिनिधींनी अजित दादा पवार यांचे आभार मानले.चौकटअनेक विषयांचा अजितदादांनी घेतला आढावाउपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी कोरोना परिस्थितीत बीड जिल्ह्यात केलेल्या उपाय योजना व करावयाच्या उपाय योजनांबाबत आढावा घेतला. लसीकरण, ऑक्सिजन, व्हेंटीलेटर व ऑक्सिजनची उपलब्धता त्याच बरोबर खरीप हंगाम, खत, बि-बियाणे, पीक कर्ज, पीक विमा आदी विषयांवरही अजित दादांनी अधिकार्‍यांकडून माहिती घेत योग्य त्या खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या. चौकटवरिष्ठांच्या सूचनेवरून थेट आ.संदिप भैय्या कंत्राटी कर्मचार्‍यांना भेटलेकोव्हिड काळात काम करणारे आरोग्य सेवक, सेविका, वॉर्ड बॉय व अन्य कंत्राटी कर्मचारी शासकीय सेवेत सामावून घेण्यात यावे, शासन सेवेत प्राधान्य मिळावे यासाठी आंदोलन करत होते. या कंत्राटी कर्मचार्‍यांच्या शिष्ट मंडळाशी बैठकी संपल्यानंतर अजित दादा पवार यांनी निवेदन घेवून सकारात्मक चर्चा ही केली. अजित दादांचा ताफा जात असतांना काही आंदोलकांनी गोंधळ घातला. यानंतर वरिष्ठांच्या सूचनेनंतर आ.संदिप भैय्या कंत्राटी कर्मचार्‍यांना जावून भेटले. अजित दादा आपल्याप्रश्नी सकारात्मक भूमिका घेत आहेत. बैठकीतच त्यांनी कंत्राटी कर्मचार्‍यांना शासन सेवेत घेत असतांना प्राधान्य दिले जाणार असल्याचे सांगितले.

वरिष्ठांच्या सूचनेवरून थेट आ.संदिप भैय्या कंत्राटी कर्मचार्‍यांना भेटले

कोव्हिड काळात काम करणारे आरोग्य सेवक, सेविका, वॉर्ड बॉय व अन्य कंत्राटी कर्मचारी शासकीय सेवेत सामावून घेण्यात यावे, शासन सेवेत प्राधान्य मिळावे यासाठी आंदोलन करत होते. या कंत्राटी कर्मचार्‍यांच्या शिष्ट मंडळाशी बैठकी संपल्यानंतर अजित दादा पवार यांनी निवेदन घेवून सकारात्मक चर्चा ही केली. अजित दादांचा ताफा जात असतांना काही आंदोलकांनी गोंधळ घातला. यानंतर वरिष्ठांच्या सूचनेनंतर आ.संदिप भैय्या कंत्राटी कर्मचार्‍यांना जावून भेटले. अजित दादा आपल्याप्रश्नी सकारात्मक भूमिका घेत आहेत. बैठकीतच त्यांनी कंत्राटी कर्मचार्‍यांना शासन सेवेत घेत असतांना प्राधान्य दिले जाणार असल्याचे सांगितले.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!