बीड

मतदानाच्या दिवशी आठवडी बाजार राहणार बंद, जिल्हा निवडणूक अधिकारी दिपा मुधोळ यांनी काढले आदेश

बीड, दि. 09 (जिमाका):- निवडणुकीमध्ये मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा तसेच मतदान शांततेत पार पडावे यासाठी सोमवार दिनांक 13 मे 2024 रोजी बीड जिल्ह्यातील ज्या गावी, ठिकाणी आठवडी बाजार भरतात ते बंद राहतील, असे आदेश जिल्हा निवडणूक अधिकारी, दीपा मुधोळ मुंडे यांनी निर्गमित केलेले आहेत.

मतदानाच्या पार्श्वभूमीवर मार्केट अँड फेअर ऍक्ट १८६२ चे कलम 5 व कलम 5 (अ) मधील तरतुदीनुसार पणन संचालक, यांनी आठवडी बाजार बंद ठेवण्यास परवानगी दिली. त्या आधारे जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी आदेश काढून मतदानाच्या दिवशी आठवडी बाजार बंद ठेवण्यास तसेच ते अन्य दिवशी भरवण्यास मान्यता दिली आहे.

बीड जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघाच्या महत्त्वाच्या तालुक्याच्या ठिकाणी आठवडी बाजार भरविण्यात येतात. यामध्ये बीड तालुक्यातील कुक्कडगाव, पारगाव सि. या ठिकाणचे बाजार, गेवराई तालुक्यातील शेकटा, लुखामसला, सिरसमार्ग, खांडवी या ठिकाणचे बाजार, शिरूर कासार तालुक्यातील बाजार तळ शिरूर कासार, फुलसांगवी या ठिकाणचे आठवडी बाजार, पाटोदा तालुक्यातील कुसळंब येथील बाजार, आष्टी तालुक्यातील खुंटेफळ पुंडी, पांगरा, धामणगाव येथील बाजार, माजलगाव तालुक्यातील राजेगाव हा बाजार, धारूर तालुक्यातील धारूर चा बाजार, वडवणी तालुक्यातील पिंपळा रुई, देवळा बु., चिखलबीड येथील बाजार, केज तालुक्यातील बोरीसावरगाव, मस्साजोग येथील बाजार आणि परळी वैजनाथ तालुक्यातील परळी वैजनाथ येथील बाजार सोमवारी भरत असून 39 बीड लोकसभा मतदारसंघात सोमवार दिनांक 13 मे रोजी मतदान असल्याकारणाने हे आठवडी बाजार बंद ठेवण्यात आलेले आहेत.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!