बीड क्राईम

राष्ट्रवादी भवनासमोर अपघात; मुलीच्या डोक्यावरून चाक गेल्याने जागीत ठार, एक गंभीर जखमी

बीड दि. 13 :- कृषी कार्यालयातील सेवानिवृत्त कृषी सहाय्यक उद्धवराव चंदनशिव हे आपल्या नातीला घेऊन वायबट वाडी येथील हनुमान मंदिराच्या दर्शनासाठी जात असताना बीड शहरातील राष्ट्रवादी भवनासमोर अपघातात नात किमया अमर देशमुख वय 9 वर्ष हिच्या डोक्यावरून ट्रेकचे चाक तिचा जागीच मृत्यू झाला.
मित्र नगर येथील राहत्या घरून वायबट वाडी येथे हनुमान मंदीरात साठी सेवानिवृत्त कृषी सहाय्यक उद्धवराव चंदनशिव वय 60 वर्ष व त्यांची किमया अमर देशमुख वय 9 वर्ष हे दोघे दुचाकीवरून जात असताना शहरातील राष्ट्रवादी भवन भवनासमोर ट्रक क्रमांक एम एच 12 आयटी 81 43 या या वाहन चालकांनी दुचाकीला मागून धक्का दिल्याने तरुण खाली पडली यात ट्रकचे चाक तिच्या डोक्यावरून गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला असून आजोबा उद्धवराव चंदनशिव हे गंभीर जखमी झाले आहे. त्यांना उपचारासाठी शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!