बीड महाराष्ट्र

‘माझी बहिण वाघिण होती’ ती असं करु शकत नाही.तिने आत्महत्येचा निर्णय घेतला असेल तर त्यामध्ये कुठलं तरी मोठं कारण असेल;इन्स्टाग्रामवर पूजाच्या बहिणीची पोस्ट

बीड, दि.13 – पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाला आता वेगळं वळण आलं असून कालपर्यंत तिच्या घरातून कसल्याही प्रकारची प्रक्रिया व्यक्त होत नव्हत्या परंतु तिच्या लहानी बहीण दिया चव्हाण हिने इन्स्टाग्रामवर पोस्ट टाकली आहे. या पोस्टमधून तिने माझी बहिण वाघिण होती. ती असं करु शकत नाही. आणि जर तिने आत्महत्येचा निर्णय घेतला असेल तर त्यामध्ये कुठलं तरी मोठं कारण असेल असं तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

  • 2 दिवसांपासून मी पाहात आहे की तुम्ही काही ही पोस्ट टाकत आहात. काही विचारपूस न करता, ती फक्त परळी वैजनाथची नाहीतर पूर्ण महाराष्ट्राची वाघिण होती माझी बहीण. पूजा लहू चव्हाण एवढी कमजोर नव्हती की कसं काही करेल आणि हे तुम्हालापण चांगलंपणे माहिती आहे.
  • मला आजसुद्धा विश्वास होत नाही तिने सुसाईड केलं आहे आणि जरी केलं असेल तर मोठीच कोणती तरी गोष्ट असेन. दीदीने नेहमी सर्वांना मदत केली आहे. काही विचार न करता तिने फक्त बंजारा समाज नाहीतर सर्वांना पाठिंबा दिला आहे. जेवढं होईल तेवढं तिने मदत केली आहे. मी तिची लहान बहीण आहे हे माझं नशीब आहे.
  • ती आज आपल्या सोबत नाही याचं जर तुम्हाला एवढं दु:ख होत असेल, तर विचार करा आम्ही कसा स्वत:ला सांभाळत आहोत. मला आधीच याचा त्रास सहन होत नाही. मम्मी पप्पाला सांभाळायचं आहे अजून. आणि तुम्ही अशा पोस्ट टाकत आहात. निदान तिला जस्टिस मिळू शकत नाही तर अशा पोस्ट करुन आम्हाला त्रास तर देऊ नका. तिला स्वर्गामध्ये शांतीने राहू द्या , ती जर हे सर्व पाहात असेल तर तिला किती त्रास होत असेल विचार करा

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!