बीड

अखेर ठरले ! डीसीसी बँकेसाठी 20 मार्चला मतदान तर 21 मार्चला मतमोजणी, सोमवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणारबीड, दि. 12 : बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची बहुप्रतिक्षीत निवडणूक अखेर जाहीर झाली आहे. जिल्हा बँकेच्या 19 जागांसाठी 20 मार्च रोजी मतदान होणार असून सोमवारी (दि.15) पासून उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत.
बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विद्यमान संचालक मंडळाची मुदत यापुर्वीच संपली आहे. मात्र कोरोनामुळे जिल्हा बँकेच्या निवडणूका लांबल्या होत्या. त्यानंतर सध्याच्या मतदार यादीवर आक्षेप घेत उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्याने ही निवडणूक लांबली होती. आता या निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. सोमवार (दि. 15) पासून ते 22 फेब्रुवारीपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. तर छानणी 23 फेब्रुवारीला होणार आहे. 24 तारखेपासून 10 मार्चपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. 19 जागांसाठी 20 मार्चला मतदान होणार असून 21 रोजी मतमोजणी होणार आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!