बीड महाराष्ट्र

पुज्याच्या आत्महत्येची वडीलांकडून दबक्यासुरात चौकशीची मागणी; उद्या समाजाची बैठक

 परळी येथील रहिवासी असलेल्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात राज्यात एकच खळबळ उडाली आहे. पूजाच्या आत्महत्येप्रकरणी चौकशी व्हावी, असा पवित्रा विरोधी पक्षांनी घेतला आहे. तर दुसरीकडे मात्र पूजा चव्हाण हिचे कुटुंब नि:शब्द आहेत. माझ्या मुलीच्या आत्महत्येची चौकशी झाली पाहिजे, एवढीच मागणी पूजाचं कुटुंबीय करत आहेत.

पूजा चव्हाण ही तरुणी मूळची परळी येथील रहिवासी आहे भावासोबत पुणे येथे राहत असताना तिचा तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला तिची हत्या की आत्महत्या अद्याप अस्पष्ट आहे. या प्रकरणात मयत पूजा हीच कुटुंब काही बोलायला तयार नाही. परळी शहरात पूजाचं घर आहे, या घरात तिचे आई-वडील राहतात पूजाच्या मृत्यूने कुटुंबावर शोककळा पसरली आहे. माझ्या मुलीच्या आत्महत्येची चौकशी करा एवढीच मागणी पूजाच्या वडिलांनी केली.

उद्या समाजाची बैठक

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात बीडमध्ये उद्या समाजाची बैठक बोलावण्यात आली आहे. या मृत्यू प्रकरणात अनेक राजकीय नेते गोवणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. त्यामुळे उद्या समाजाच्या या बैठकीत काय निर्णय होणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!