धारूर

धारुरमध्ये कोरोनाचा तिसरा बळी; प्रतिष्ठित व्यापारी वसंत कुंभार यांचा मृत्यु

किल्ले धारुर दि.20 (लोकाशा न्युज) : धारुर तालुक्यात कोरोनाचा तीसरा बळी गेला असुन प्रतिष्टीत सोन्याचे व्यापारी वसंत कुंभार यांचा कोरोनावर उपचार सुरु असताना अंबाजोगाई येथील स्वराती रुग्नालयात दि.२० बुधवार रोजी त्यांची प्राणज्योत मावळली आहे. त्यांच्या निधनाने सर्वञ हळहळ व्यक्त होत आहे.
तब्बेत बरी नसल्याने मागील आठ दिवसाखाली स्वताहुन वसंत कुंभार हे अंबाजोगाई येथील स्वराती रुग्नालयात दाखल झाले होते. यावेळी त्याची कोरोना टेस्ट घेण्यात आली असता ते पाॕझिटिव्ह आढळुन आले होते. तेथेच त्यांच्यावर आठ दिवसापासुन उपचार सुरु होते. माञ प्रकृतीने साथ न दिल्याने बुधवारी पहाटे पाच वाजता त्यांची प्राणजोत मावळली. त्याच्या निधनाने सर्वञ हळहळ व्यक्त होत आहे. आजपर्यतचा धारुर तालुक्यातील कोरोनाचा हा तीसरा बळी आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!