बीड धारूर

पाच वर्षाच्या बालकाला ट्रॅक्टरने चिरडले; धारुर बस स्थानकसमोरील घटना: घटनास्थळी गर्दी व नातेवाईकांचा आक्रोश

धारुर :रस्ता ओलांडताना पाच वर्षांचा बालक ट्रॅक्टरच्या टायरखाली येऊन चिरडून जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार दि. 22 एप्रिल रोजी सकाळी धारूर बस स्थानक समोर तेलगाव रस्त्यावर घडली आहे. घटनास्थळी मोठी गर्दी जमली असून नातेवाईकांच्या आक्रोश ह्रदय हेलावून टाकणारा आहे.
शिवराज लक्ष्मण सुरवसे ( वय ५ वर्ष ) रा. संभाजीनगर झोपडपट्टी धारुर असे मयत चिमुकल्याचे नाव आहे. सकाळीच शिवराज बस डेपोच्या पाठीमागे असलेल्या शेतात अज्जी सोबत गेला होता. ९ ते ९:३० दरम्यान शेतातून परत घरी येताना बस डेपो जवळ रस्ता ओलांडताना धारुर येथून तेलगावच्या दिशेने चाललेला ट्रॅक्टर क्रमांक एम.एच. ४४ डी १९०८ याच्या मोठ्या टायर खाली येऊन चिरडला गेला. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी अपघात घडताच धाव घेतली परंतु बालकाचा जागीच मृत्यू झाला. ट्रॅक्टर चालकाने बालकाला वाचविण्याचा प्रयत्न केला परंतु यश आले नाही व त्या नादात ट्रॅक्टर रस्त्याच्याखाली गेले. सकाळी सकाळीच दुर्दैवी घटना घडल्याने धारुर शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!