बीड धारूर

धारूर घाटाच्या दरीत सिंमेट कॉंक्रीटचा टँकर कोसळला; चालक जागीच ठार

धारूर : धारूर घाटातील दरीत सोलापूरहून निघालेला सिंमेट कॉंक्रीटचा टँकर ( क्र. एमएच 12 एनएक्स 4090 ) आज सकाळी कोसळला. या अपघातात चालक जागीच ठार झाला. या घाट रस्ता अरुंद असल्याने वारंवार होणाऱ्या अपघातामुळे वाहनधारकांमध्ये भितीचे वातावरण आहे.
राष्ट्रीय महामार्गावर आल्यानंतर धारूर-तेलगाव रस्ता रस्ता चकाचक झाला आहे. माञ घाटातील रस्ता अरूंदच राहिला आहे. यामुळे घाटात अपघाताचे प्रमाण वाढले आहे. शनिवारी पहाटे सोलापूरकडून सिंमेट भरून परभणीकडे जाणारा टँकर सकाळी साडेनऊच्या दरम्यान घाटातील अवघड वळणावर कठडा तोडून दिडशे ते दोनशे मिटर खोल दरीत कोसळला. यात चालक पैंगबर पटेल गंभीर जखमी झाला. अपघाताची माहिती मिळताच धारूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी नितीन पाटील तात्काळ पथकासह घटनास्थळी पोहचले. चालकास धारूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे डॉक्टरांनी चालकाला तपासून मृत घोषित केले.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!